मी बरंच काही सहन केलंय…; शरद पवारांच्या टीकेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

मी बरंच काही सहन केलंय…; शरद पवारांच्या टीकेवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan On Sharad Pawar : राज्याच्या (maharashtra) राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)बिघाडी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी राष्ट्रवादीवर (NCP) जोरदार निशाणा साधला होता. त्यावरुन आता पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरद पवारांनी (Sharad Pawar) पलटवार केला. त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या टीकेवर त्यांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. भाजपविरोधात आघाडी मजबूत होणं गरजेचं असल्याचेही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

‘DRDO’चे संचालक कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश

चव्हाण म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत, वडिलकीच्या नात्याने बोलले तरी त्याचं मला काही वाटत नाही. बरच काही सहन केलेलं आहे. महाविकास आघाडी मजबूत व्हायला हवी. ज्या कारणासाठी महाविकास आघाडी केली आहे, कोणीतरी मंत्री व्हावं, कोणाला पदं मिळावी म्हणून झाली नाही, इथं भाजपचा जो विषारी विस्तार होत चाललेला आहे, तो थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्याला कोणीही अपशकून करु नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

कर्नाटकमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी चालू असल्याची टीका केली होती. या संपूर्ण घटनेवरुन शरद पवारांनी भाष्य केलं.

चव्हाणांबद्दल पवार म्हणाले की, काही लोकांची पक्की मतं असतात, ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्यांचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं राष्ट्रवादी स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येकवेळी त्यांचं आमच्याबद्दल प्रतिकूल मत असतं, त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे मला माहिती नाही, अशा खोचक शब्दांमध्ये शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यावर आता पृथ्वीराज चव्हाणांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शरद पवारांना वडिलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. भाजपविरोधात आघाडी मजबूत होणं गरजेचं आहे, असं बरचकाही आपण सहन केलेलं आहे, असंही यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube