Raj Thackeray यांनी कर्नाटक निवडणुकीवर भूमिका का बदलली ? नवीन ट्वीट वाचा

Raj Thackeray यांनी कर्नाटक निवडणुकीवर भूमिका का बदलली ? नवीन ट्वीट वाचा

Raj Thackeray On Karanatak Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी दहा मे रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. मराठी भाषिक असलेल्या भागात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रचार करण्यात आला. त्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट करत कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु ट्वीटमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत लिहिताना राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्ती केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट डिलिट करून नवे ट्वीट केले आहे.

सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवे, अशी भूमिका पहिल्या ट्टीटमध्ये राज ठाकरे यांची होती.

तुम्ही आमच्या लोकांची काळजी करू नका; अजित पवारांनी फडणवीसांना झापले

या ट्वीटवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच राज ठाकरे यांच्यावर ट्टीटवर अनेकांनी नाराजी व्यक्ती केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी दुसरे ट्वीट केले. सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत, असे म्हटले आहे

राज ठाकरे यांचे नवे ट्वीट
सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.

ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवे, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.
आपला
राज ठाकरे

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube