भाजपचा ‘कमळा’चा डाव! राऊत म्हणाले, 2024 मध्ये लोक यांच्या तोंडाला…

भाजपचा ‘कमळा’चा डाव! राऊत म्हणाले, 2024 मध्ये लोक यांच्या तोंडाला…

Sanjay Raut : संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरून आता नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर यांच्याऐवजी कमळच का मुद्रित केले गेले? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी सरकारला संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचं फूल लावू द्या. मात्र, जनता 2024 च्या निवडणुकीत पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही. लोक यांच्या तोंडाला चिखल लावणारच आहेत.

Maratha Reservation : जरांगेंना CM शिंदेंचा फोन; दोघांत काय झाली चर्चा ?

सरकारला मनोज जरांगेंना संपवायचंय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) उपोषण करत आहेत. यावरही राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य करत सरकारवर गंभीर आरोप केला. या सरकारला मराठा आरक्षणावर काहीच करायचं नाही. हे सरकार घाबरट आहे. सरकार फक्त आश्वासन देतं. या सरकारला मनोज जरांगेंना (Manoj jarange) संपवायचं आहे. त्यांना काहीही काळजी नाही, असा आरोप राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

तरीही तुमच्यावरील 50 खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाहीत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्या ब्रिटनमधील घर आणि संपत्तीबाबत आरोप केले होते. त्यावरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. मला याविषयी काहीही माहिती नाही. पण, उद्धव ठाकरेंच्या घराच्या चाव्या अजय अश्रफ नावाच्या बिल्डरकडे असतील. असे बोलल्याने त्यांच्यावरील 50 खोक्यांचे आरोप धुतले जाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावं.

Agriculture News : शेतकऱ्यांची चिंता वाढली; खते महागणार, रशियाकडून खतांवरील सवलत बंद 

इंडिया आघाडीच्या जागावाटपात अडचण येणार नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीमध्ये को-ऑर्डिनेशन कमिटीची बैठक आहे. तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. कारण, अभिषेक बॅनर्जींना आजच ईडीचा समन्स आला आहे. ही बदल्याची कारवाई आहे. अभिषेक बॅनर्जीवर सूडबुद्धीने राजकारण केले जाते आहे. आमच्या कमिटीमधील हेमंत सोरेन, अभिषेक बॅनर्जी आणि माझ्यावर सुद्धा दबाव आहे, पण काही झालं तरी या दबावाला झुकायचे नाही. लोकसभेच्या जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube