अजितदादा भावी मुख्यमंत्री ! संजय राऊत म्हणाले, अमित शहांनाच नागपुरात..

Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपुरात बॅनर झळकले होते. मात्र, फडणवीसांनी फटकारल्यानंतर हे बॅनर काढून घेण्यात आले. आज त्याच नागपुरात अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स झळकले आहेत. काही बॅनर्सवर लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. मुंबई, नवी मुंबई आणि नागपुरातले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत.
नागपूर शहरातील लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत. आता या बॅनरवर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नाव घेत प्रतिक्रिया दिली आहे.
भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर
राऊत यांनी आज प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या बॅनर्सबाबत प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, म्हणूनच कोणते बॅनर जोरदार आहेत हे पाहण्यासाठी अमित शहा महाराष्ट्रात येत आहेत.
गृहमंत्री अमित शहा आज (26 एप्रिल) दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. मागील आठवड्यात ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा येत आहेत.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांना ‘अच्छे दिन’, संजय राऊतांचा हल्लाबोल
फडणवीस रागावले
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे बॅनर नागपुरातील बुटीबोर नगरपरिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी लावले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात काही भूकंप होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
या प्रकारावर फडणवीस यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, नागपुरमध्ये भावी मु्ख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. ज्यांनी कोणी ते लावले आहेत त्यांनी ते काढून टाकावेत. काही अतिउत्साही लोक असतात, ते असं करतात.