संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी निकटवर्तीय ताब्यात

संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी निकटवर्तीय ताब्यात

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic Offenses Branch)दोघांना अटक करण्यात आलीय. यामध्ये अटक झालेल्यांमध्ये राजीव साळुंखे (Rajeev Salunkhe)आणि सुनील कदम (Sunil Kadam)अशी त्यांची नावं आहेत. हे दोघेही राऊतांचे निकटवर्तीय असल्याचं मानलं जातंय. या कथित घोटाळ्याप्रकरणी ऑगस्ट 2022 मध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलं होतं.

आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीनंही गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय. या प्रकरणात राऊतांना अटकही झाली होती आणि त्यानंतर जामीनही मंजूर झालाय. त्याशिवाय याच कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नोटीस बजावली होती आणि चौकशीही झाली. या प्रकरणात दोन जणांना अटक झाल्यानं आता पुढं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार, घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 50 रुपयांनी महागला

या प्ररणामध्ये मुंबई महापालिकेकडून कोव्हिड काळात कोव्हिड सेंटर्सची कंत्राटं दिली होती. त्यातच सुजित पाटकर यांच्या कंपनीला दोन ते तीन कोव्हिड सेंटर चालवण्याची परवानगी दिली होती. या कोव्हिड सेंटरसाठी जी कंपनी त्यांनी वापरली होती लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट तिची नोंदणी झाली नव्हती. तरीही त्यांना कंत्राट दिलं होतं.

कोव्हिड काळात जून 2020 मध्ये हे कंत्राट त्यांना देण्यात आलं. त्यानंतर एका वर्षानंतर त्यांच्या कंत्राटाचा करार महापालिकेबरोबर पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये जो एक वर्षाचा कालावधी होता त्यात 32 ते 35 कोटींचा फंड सुजित पाटकर यांच्या कंपनीला दिला. मुंबईशिवाय पुण्यातही सुजित पाटकर यांना अशीच कंत्राटं मिळाली होती.

याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. ते त्यासाठी पुण्यातही गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लादेखील झाला. हे प्रकरण वेगळं आहे. पण मुंबईतील प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली होती. त्याच वेळी ईडीनं जी चौकशी सुरू केली आहे, त्याबाबत त्यांना अशी शंका आहे की, जे पैसे 32 ते 35 कोटी किंवा 100 कोटींचा आरोपही सोमय्यांनी केलाय. 100 कोटीपर्यंतचा फंड सुजित पाटकरांना मिळाला होता. त्यामुळं याप्रकरणी ईडीकडून देखील याची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळच ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी सुरू केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube