२०२४ला दीपक केसरकरांनीच जेलमध्ये जायची तयारी ठेवावीः संजय राऊत

  • Written By: Last Updated:
२०२४ला दीपक केसरकरांनीच जेलमध्ये जायची तयारी ठेवावीः संजय राऊत

मुंबईः उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकमेंकाना तुरुंगात टाकण्याची भाषा केली जात आहे. २०२४ला दिपक केसरकरांनीच जेलमध्ये जायची तयारी ठेवावी, सगळे तयार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले होते. त्याला राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी महाराष्ट्र आणि पक्षासाठी जेलमध्ये जायला तयार आहे. तुमच्यासारखे लफंगे, पळपुटे नाहीत, असा आरोप राऊतांनी केसरकर यांच्यावर केला आहे. तुम्ही म्हणजे न्यायालय, कायदा नाहीत. २०२४ साली दीपक केसरकर यांनीच तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी, सर्व सगळे तयार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर परिवर्तनाची नांदी ठरेल

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेच्या युतीबाबत राऊत म्हणाले, प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर परिवर्तनाची नांदी ठरेल. शिवशक्ती – भीमशक्ती एकत्र यावे ही आमची इच्छा आहे. जर देशातील आणि राज्यातील सत्ता उलथवायची असेल तर भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवी आहे. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार आहे. दलित व वंचित समाज त्यांच्यामागे उभा राहतो. ते आमच्याबरोबर आल्यास महाराष्ट्रात, देशात परिवर्तन घडेल, असा दावा राऊत यांनी केला आहे.

राज्यपालांवर गप्प का ?

शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत वाद निर्माण करू नये, महाराष्ट्राला इतिहास आहे. तर इतर राज्यांना भूगोल आहे. अजित पवारांच्या विधानावर गदारोळ करणारे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याविरोधात भाजप, मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी गुजरातला जावे

मुंबई राज्यांच्या विकासात योगदान देत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. उत्तर प्रदेशचा विकास करायचा असेल तर योगी यांनी गुजरातमध्ये जावे, असे राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube