सत्यजित तांबे यांनी सांगितली २०२४ च्या निवडणुकीची तयारी!

सत्यजित तांबे यांनी सांगितली २०२४ च्या निवडणुकीची तयारी!

अहमदनगर : राज्यात 288 विधानसभेचे मतदारसंघ असून त्यापैकी कोणत्याही मतदारसंघातून संधी मिळणार तेथून मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं युवक कॉंग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं आहे.लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय.

ते म्हणाले, मला लोकसभेत, आणि विधानपरिषदेत काम करण्यास रस नसून विधानसभेतच काम करण्यात रस आहे. माझ्या दृष्टीने राज्य पातळीवरील काम महत्वाचं आहे. राजकारण हे परिस्थितीवर अवलंबून असतं. आता पुढील परिस्थिती कशी निर्माण होणार? याबद्दल मला माहित नसल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलंय.

पुढे बोलताना ते म्हणाले, चांगलं काम करायचं असेल तर आमदार, खासदार होण्याची गरज नाही. महाराष्ट्रात 288 विधानसभा आणि 75 विधानपरिषदेचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आमदार झालंचं पाहिजे असं काही नाही. बुलंदपणे काम करायचं असेल तरच एखाद्या व्यासपीठाची गरज भासते.

संगमनेर मामांचा मतदारसंघ असल्याने संगमनेरमधून निवडणुक लढवणं शक्य नाही. 2009 साली शिर्डीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी मला शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी रस होता. त्यावेळी आमच्या संगमनेर तालुक्याचं जवळपास 60 हजार मतदान शिर्डी मतदारसंघात गेलं होतं.

मात्र, राजकारणात परिस्थिती बदलत असते. प्रत्येक निवडणुक आणि प्रत्येक दिवसही सारखा नसतो त्यामुळे आता सध्या तशी परिस्थिती आहे, असं मला वाटत नसल्याचं सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, 2024 साली सत्यजित तांबे विधानसभा निवडणुक लढणार असून नेमक्या कोणत्या मतदारसंघातून ते निवडणुक लढवणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यातचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube