Politics : परभणीत शिंदे गटाचा राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न?

Politics : परभणीत शिंदे गटाचा राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न?

मुंबई : परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते, आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) हे शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक असल्याचं शिंदे गटाचे नेते सईद खान (saeed khan)यांनी सांगितलंय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. बाबाजानी यांनी सईद खान यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना फोन करुन याबद्दल चर्चा केली. सईद खान यांना चुकीची माहिती न पसरवण्याचं आवाहन देखील केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्रानी हे शिंदे गटात सहभागी होण्यासाठी इच्छूक असल्याचं सईद खान यांनी सांगितलंय. त्याचबरोबर दुर्रानी यांनी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांची भेट घेतल्याचाही दावा सईद खान यांनी केलाय. पण त्यांचे हे आरोप बाबाजानी दुर्रानी यांनी फेटाळले आहेत.

अर्जुन खोतकर आणि बाबाजानी दुर्रानी यांच्यातील फोनवरील ऑडिओ क्लिप समोर आलीय. परंतु लेट्सअप मराठी (LetsUpp Marathi) या ऑडिओ क्लिपची (Audio Clip) पुष्टी करत नाही. पण या ऑडिओमधून दुर्रानी यांनी आपण शिंदे गटात जाणार नसून आपण अर्जुन खोतकरांना त्याविषयी काही बोललेलो नाही, असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती सुरुवातीला स्वतःची ओळख बाबाजानी दुर्रानी यांचा पीए असल्याची ओळख सांगताना ऐकायला मिळतेय. त्यानंतर बाबाजानी दुर्रानी यांना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी बोलायची इच्छा असल्याचं सांगण्यात येते. त्यानंतर बाबाजानी दुर्रानी आणि अर्जुन खोतकर यांच्यात संभाषण सुरु होतं, असा दावा केला जात आहे.

त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलंय की,
अर्जुन खोतकर : हॅलो
बाबाजानी : बाबाजानी बोल रहा हँ साहेब
अर्जुन खोतकर : अरे, बोल-बोल, नमस्कार!
बाबाजानी : अरे मला यायचं होतं. ते गब्बरने 19 तारखेला तुम्हाला भेटायला येणार असल्याचं म्हटलं आहे.
अर्जुन खोतकर : नाही, नाही. काही संबंध नाही. तुम्ही आलेसुद्धा नाहीत. भेटलेही नाहीत. मी त्याला बोललो की बाबाजानी : मला फोन आला होता. पण ते त्याबद्दल काही बोलले सुद्धा नाहीत.
अर्जुन खोतकर : मी बोललो की त्यांच्यासोबत माजी भेटही झाली नाही.
बाबाजानी : तेच म्हणतोय, असं कस होत आहे?
अर्जुन खोतकर : नाही, नाही. आपली भेट होऊन वर्ष उलटलं असेल.
अर्जुन खोतकर : नाही त्यांनी चुकीचं म्हटलं आहे. मी त्यांना जाहीरपणे बोलेन.
बाबाजानी : हा तुम्ही त्यांना जाहीरपणे बोला की, अशाप्रकारे चुकीची माहिती पसरवू नये
अर्जुन खोतकर : नक्की बोलेन. प्रेसवाल्याला माझ्याकडे पाठवून द्या. मी बोलतो.
हा बोलून द्या.
अर्जुन खोतकर : बाबाजानी आणि माझी काही भेट झालेली नाही. ती बातमी चुकीची आहे. माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नव्हता, असं मी बोलेन
बाबाजानी : हा, बिल्कुल…
अशा प्रकारे त्यांचं संभाषण झाल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांची राजीखुशी विचारतात आणि त्यानंतर ही ऑडिओ क्लिप संपते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube