लढाई संपली! आता एकत्र येऊ, औंध बोपोडीला अग्रेसर ठेऊ, सनी निम्हण यांनी घेतली प्रकाशजी ढोरेंची भेट

येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे सर्वांनी सोबत असंल पाहिजे.

  • Written By: Published:
News Photo   2026 01 20T153705.106

निवडणूक म्हटलं की प्रतिस्पर्धी उमेदवावर (Election) टीका करायची, मात्र त्या पलीकडे जाऊन निवडणूक संपल्यावर दोन परस्पर विरोधी निवडणूक लढवलेले उमेदवार एकमेकांना भेटतात हे अलीकडे दुर्मिळ झाले आहे.  मात्र लढाई संपली आता सर्वजण एकत्र येऊ, आपल्या औंध बोपोडीला विकासात अग्रेसर ठेऊ , असं म्हणत औंध – बोपोडी प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी घेतली विरोधकांची भेट घेतली.

या विषयी बोलताना सनी निम्हण म्हणाले, निवडणूका येतात जातात. निवडणुकीची लढाई हि व्यक्तीशी नसून विचारांची लढाई असते असे मी मानतो. हाच विचार पुढे नेत आज निवडणुकीच्या धामधुमीनंतर  प्रकाशजी ढोरे यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी  विनायक रणपिसे उपस्थित होते.

Sameer Gaikwad Death : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा मृत्यू; कारण काय?

येत्या काळात औंध बोपोडी परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण झाली. या परिसराविषयी त्यांचा ध्यास आणि कार्य पाहता पुढील काळात औंध बोपोडीच्या विकासासाठी त्यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे. शेवटी वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी औंध बोपीडीच्या विकासासाठी आपण सर्व मतभेद बाजूला ठेऊन एकत्र यायला पाहिजे असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे.

सगळ्यांना सोबत घेऊन सर्वांच्या सहभागातून विकास हि स्वर्गीय कार्यसम्राट आमदार विनायक निम्हण यांची शिकवण अशाच संस्कारांची नित्य प्रेरणा देत असते असेही सनी निम्हण यांनी नमूद केले.

follow us