संसदेतील शिवसेना कार्यालयातून ‘उद्धव ठाकरें’ना काढलं बाहेर…

संसदेतील शिवसेना कार्यालयातून ‘उद्धव ठाकरें’ना काढलं बाहेर…

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं (Election Commission)शिवसेना (Shivsena)हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालय (Shiv Sena Office in Parliament)देखील शिंदे गटाला (Shinde Group)देण्यात आलं. आता शिदे गटाकडं हे कार्यालय आल्यानंतर त्याचा चेहरामोहराचं बदलल्याचा पाहायला मिळतोय. या कार्यालयातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे फोटो काढून टाकले आहेत.

संसदेच्या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या फोटोऐवजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.

Arvind Sawant : मातोश्रीवरील ताब्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही…

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत परिणाम झाल्याचे पाहायला मिळताहेत. आधीची रचना आता बदलण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आता शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आनंद दिघे यांचा फोटो लागला आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक असे ठाकरे गटाला धक्के दिले जात आहेत. आत्तापर्यंत संसदेच्या शिवसेना कार्यालयात दोन्ही गटाचे खासदार बसत होते मात्र आता संपूर्ण कार्यालय शिंदे गटाला मिळालंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube