जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पण निवडणूक लांबणीवर?

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Untitle (3)

Zilha Parishad & Panchyat Samiti Elections : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता पुढील काही महिन्यांतच निवडणुकीच्या हालचाली सुरु होतील, असा अंदाज व्यक्त होत असतानाच निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्यात एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. त्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी 2026 मध्ये पार पडल्या आहेत. उर्वरित 22 जिल्ह्यात 50 टक्के आरक्षणाच्या पेचामुळे निवडणुका रखडलेल्या आहेत. काल 29 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित निवडणुका घेण्याबाबतचे आदेश दिल्यानंतर निवडणुका घेण्याच मार्ग मोकळा झाला. परंतू अल निनोमुळे दुष्काळाची छाया, एसआयआर, जनगणना या तीन गोष्टींमुळे निवडणुका अजून एक वर्ष तरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना निवडणुकीबाबत मोठं विधान केलंय. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश अद्याप आमच्यापर्यंत पोहोचले नसून निर्देश पाहून निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं वाघमारे यांनी स्पष्ट केलंय.

सर्वोच्च न्यायालायने आदेशात नेमकं काय म्हटलं?
महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशांमधील अटी व शर्तींनुसारच पार पाडल्या जाव्यात. जुन्या अटी आणि शर्तींचे पालन केल्याचा अहवाल प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा. या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला मनुष्यबळ सहाय्य देण्याचे आवाहनही खंडपीठाने केले आहे.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी लोकशाही प्रक्रिया का थांबवली जावी अशी विचारणा केली. सॉलिसिटर जनरल यांनी कोणाला तरी यावर आक्षेप असू शकतो, असे नमूद करताच सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, आम्ही आधीच असा आदेश दिला आहे की, अंतरिम व्यवस्था म्हणून निवडणुका घेतल्या जाव्यात. ज्या निवडणुका अजून बाकी आहेत, त्याही घेतल्या जाऊ शकतात. मात्र, त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील.

follow us