दहीहंडीत अश्लील नृत्य करणं भोवलं, निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह 8 जणींवर गुन्हा दाखल

आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांचा देखील समावेश आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 09T161222.009

Case registered in Pune against dancers :  पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रसिद्ध नृत्यांगना राधा पाटील हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आणखी आठ नृत्यांगनांविरोधात पुढे पोलिसांनी कारवाई केली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या आठ नृत्यांगनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगणा निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ नृत्यांगनांवरच नव्हे, तर कार्यक्रमाच्या आयोजक आणि संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यानावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

दहीहंडीच्या निमिताने पुण्यात विविध ठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना मोठी गर्दी झाली होती. मात्र काही कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी वाजवून त्यावर आक्षेपार्ह हावभाव करत नृत्य सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणाची दखल घेत सहकारनगर पोलीआणि कारवाई केली आहे. गुन्हा दाखक झाल्यामुळे संबंधित नृत्यांगना आणि आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा सरकारी नोकरीसाठी वापर? पुण्यातून उघड झालेल्या ‘कुराश’ प्रकरणाची राज्यभर चर्चा

या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच कार्यक्रमादरम्यान लागू असलेल्या नियम आणि अटींचे पालन करण्यात आले होते का, याचा देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. महाराष्ट्रातील कला, लोककला, चित्रपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांशी निगडित रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमानुसार आवश्यक प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या नृत्य कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलिसांची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, याची देखील पडताळणी केली जात आहे.

या प्रकरणात कारवाईची व्याप्ती फक्त कलाकारांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच रिस्की बॉईज ग्रुपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याविरोधात देखील सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दहीहंडी कार्यक्रमात आक्षेपार्ह नृत्य सादर केल्याच्या आरोपांवरून नृत्यांगनांसोबतच कार्यक्रमाच्या आयोजकांनाही पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान दहीहंडीत नृत्य कार्यक्रमांवरून राज्यातील इतर ठिकाणी देखील वाद निर्माण होताना दिसत आहेत. ठाण्यात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या विरोधात भाजपच्या नगरसेविकेच्या तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवातील नृत्य कार्यक्रम आणि त्यामधील सादरीकरणाचा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Tags

follow us

संबंधित बातम्या