पुणे दौऱ्यात शिंदेंची आढळरावांच्या घरी अनपेक्षित भेट कारण काय? राजकीय चर्चांना उधाण…

Eknath Shinde च्या पुणे दौऱ्यातील एका अनपेक्षित भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Eknath Shinde

Eknath Shinde unexpected visit to Adhalrao’s home during Pune tour Political speculation is rife : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यातील एका अनपेक्षित भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भीमाशंकर दौरा आटोपून परतताना शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आंबेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नियोजित दौऱ्यात या भेटीचा समावेश नसल्याने या राजकीय भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

पीएमआरडीए’च्या ‘स्ट्रक्चरल प्लॅन’ला गती; सर्व शासकीय विभागांना आठ दिवसांत नियोजन सादर करण्याचे निर्देश!

एकनाथ शिंदे सोमवारी भीमाशंकर येथे आले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी अचानक आंबेगावच्या दिशेने आपला ताफा वळवला. त्यानंतर त्यांनी आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर शिंदे यांच्या भेटीबाबत भावना व्यक्त केल्या. “क्षण आनंदाचा, क्षण जिव्हाळ्याचा!” असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्या भेटीमुळे आपल्या कुटुंबाला आनंद झाल्याचे नमूद केले. तसेच शिंदे यांचे नेतृत्व आणि आपुलकी आपल्याला कायम ऊर्जा देत राहील, असेही त्यांनी म्हटले.

हा एस्टॉपेलचा मुद्दा नाही; शिंदे गटाचा ठाकरे गटावर तार्कीक वार, 2018च्या पक्षघटनेवर शिंदेंच्या वकिलाचा जोरदार प्रहार

आढळराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा प्रवेश करण्याच्या दृष्टीने ही भेट होती का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मात्र, दोन्ही नेत्यांकडून भेटीमागील राजकीय कारणाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल, नितीन गडकरींना मोठा धक्का; खातं जाणार?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर त्यांनी शिंदे गटाची साथ सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला. या पराभवानंतर आढळराव पाटील यांची सक्रिय राजकारणातील उपस्थिती तुलनेने कमी झाल्याचे चित्र होते. मात्र, शिंदे यांच्या अचानक झालेल्या भेटीमुळे ते पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

अण्णा हजारे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या सदिच्छा; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेतली भेट

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सध्या महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे शिंदे यांनी आढळराव पाटील यांच्या घरी दिलेली ही भेट नेमकी कोणत्या राजकीय समीकरणाची नांदी आहे, याकडे पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

follow us