जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन ; तब्बल 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

Jadhavar Group of Institutes : राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि प्रेम हे संपूर्ण जगभरात टिकून रहावे, यासाठी नऱ्हे येथील जाधवर

Jadhavar Group Of Institutes

Jadhavar Group of Institutes : राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि प्रेम हे संपूर्ण जगभरात टिकून रहावे, यासाठी नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारली. तसेच आजुबाजुच्या परिसरातील पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दलातील सेवक, स्वच्छता कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना राख्या बांधून विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिका-यांनी रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरे केले.

जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मानवी राखी साकारण्यात आली होती. यावेळी विविधरंगी वेशात विद्यार्थ्यांनी राखीचे विविध प्रकार देखील उपस्थितांसमोर साकारले. यामध्ये तब्बल 200 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, रक्षाबंधन हा बहिण आणि भावाचा सण. मात्र, आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजातील विविध घटकांसाठी झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशमन दलातील सेवक, स्वच्छता कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांना राखी बांधण्यात आली. यानिमित्ताने बंधुता, प्रेम व एकतेचा संदेश देण्याकरिता विद्यार्थ्यांनी ही मानवी राखी देखील साकारली. लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश जावा, याकरिता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इतिहासातील सर्वात मोठा करार; व्हेनेझुएलामधील 65 अब्ज बॅरल तेलावर अमेरिका मिळवणार नियंत्रण

follow us