पुण्यात भीषण अपघात ! ट्रकला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू

  • Written By: Published:
पुण्यात भीषण अपघात ! ट्रकला आग लागून चौघांचा होरपळून मृत्यू

पुणेः पुणे शहरात (Pune City) अपघाताची मालिका सुरूच आहे. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारासही पुणे शहरात एक भीषण अपघात झाला आहे. कंटेनरला धडक दिल्याने ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यात एका लहानग्याचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ हा अपघात झाला आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ट्रकमधून बाहेर काढले आहेत. यात मृत्यू झालेल्यांची नावे उशीरापर्यंत समजलेली नाहीत. मक्याचा भुसा घेऊन मुंबईकडे निघालेला भरधाव ट्रक स्वामी नारायण मंदिराजवळून जात होता. त्याचे वेळी ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. हा ट्रक कंटेनरला पाठीमागून धडकला. त्यानंतर ट्रकला आग लागली. ट्रकच्या केबीनमध्ये बसलेल्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube