ब्रेकिंग: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 50 ते 60 दुकाने जळून खाक, 27 अग्निशमन गाड्या घटनास्थळी

Pune Timber Market Fire: पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (18 नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली.

Pune Timber Market Fire

Pune Timber Market Fire: पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (18 नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण आग लागली. पहाटे 2 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास जय वल्लभ शाळेजवळील लाकडाच्या दुकानांना आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील 50 ते 60 दुकानांना आगीची झळ बसली.

वनविभागाने अदानींचं काम रोखलं, अदानींच्या अधिकाऱ्यांची वनमंत्र्यांकडे धाव; तारळी प्रकल्पावरून नेमका वाद काय?

आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी पुणे अग्निशमन दलाच्या 24, पुणे कॅन्टोन्मेंटची 1 आणि पीएमआरडीएच्या 2 अशा एकूण 27 अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. सुमारे 150 अग्निशमन जवानांनी दोन तासांहून अधिक काळ प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, आग जवळच्या निवासी वसाहतीत पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरू असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

follow us