बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या अनोख्या उपक्रम

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati: गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Punit Balan

Shrimant Bhausaheb Rangari Ganapati : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust) वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमात तब्बल 12 हजार 360 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे पठण केले. पुण्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून उपक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली आहे.


Shivsena Hearing : EC ने एकनाथ शिंदेंना चिन्ह कोणत्या आधारे दिलं? ‘सर्वोच्च’ न्यायालयाचा खडा सवाल

गणेशोत्सवातील धार्मिक परंपरा आणि विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ठरवून दिलेल्या वेळेनुसार सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन माध्यमातून एकाच वेळी गणेशस्तोत्राचे सामूहिक पठण केले. या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये करण्यात आली असून यावेळी एशिया बुकच्या न्याय निर्णायक चित्रा जैन यांनी या रेकॉर्डसचे प्रमाणपत्र ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्याकडे सुपूर्द केले.

VIDEO : मुस्लिम IPS Bushra Bano ने ‘अस्सलाम-अलैकुम’ म्हटलं…तडकाफडकी बदली?

पुणे शहरासह परिसरातील विविध भागांतील शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये महेश विद्यालय इंग्लिश स्कूल (कोथरूड), महेश विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल (कोथरूड), धनिराज स्कूल (वाकड), पूना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड (कोरेगाव पार्क), जागृती ब्लाइंड स्कूल फॉर गर्ल्स, सिंहगड इन्स्टिट्यूट (एरंडवणे), अहिल्यादेवी शाळा, पुणे, रमणबाग स्कूल, केएचएस स्कूल कन्नड, न्यू मा. वि. शाळा, हुजूरपागा (कात्रज), हुजूरपागा (नारायण पेठ), हुजूरपागा इंग्लिश मीडियम (नारायण पेठ), क्लारा स्कूल (बी. टी. कवडे रोड), क्लारा स्कूल (सिंहगड रोड), कटारिया स्कूल, भाऊ रंगारी मंडप किड्स, प्राध्यापक नाथ हरी पुरंदरे प्राथमिक विद्यालय, विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रोड) या शाळांचा समावेश होता.

follow us