अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात मोठा बदल; संजू सॅमसन करणार कमबॅक?
IND vs AFG : श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आपल्या घराच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत
IND vs AFG : श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघ आता आपल्या घराच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघात कुणाला संधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ही मालिका 13 ,15 आणि 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची पुढील काही दिवसात घोषणा देखील होणार आहे.
तर दुसरीकडे या मालिकेनंतर भारतीय संघ जपानमध्ये होणाऱ्या 2026 च्या आशियाई खेळांमध्येही सहभाग घेणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआय मजबूत संघ मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.
अभिषेक शर्माला डच्चू ?
तर दुसरीकडे या मालिकेसाठी गेल्या काही दिवसांपासून खराब कामगिरी करणारा भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील त्याची कामगिरी खराब ठरली होती. त्याला धावा करता आल्या नव्हते. अफगाणिस्तान मालिकेसाठी त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते आणि त्याला कदाचित वगळलेही जाऊ शकते. तर संजू सॅमसनचे संघात पुनरागमन होऊ शकते.
अफगाणिस्तान मालिकेसाठी काही खेळाडूंचे संघात स्थान निश्चित मानले जात आहे. श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, ईशान किशन आणि अर्शदीप सिंग यांची निवड जवळपास निश्चित दिसते. तसेच, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा याच्या फिटनेसकडे सर्वांचे लक्ष असेल. दुखापतींमुळे हे खेळाडू सध्या संघाबाहेर आहेत आणि त्यांच्या समावेशाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांनाही संधी मिळू शकते. भुवनेश्वर 2022 पासून संघाचा भाग राहिलेला नाही.
सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले –
भारताचा संभाव्य संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मयंक यादव, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव.