T20 World Cup: संजू, तिलकने टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट काढलं; वेस्ट इंडिजला हरविले
West Indies VS India-संजू सॅमसनने (Sanju Samson) विडिंजची गोलंदाजी फोडून काढत षटकार व चौकार मारत धावांची 97 तुफानी खेळी केली.
West Indies VS India: टी-20 वर्ल्डकपच्या ( T20 World Cup) सुपर आठच्या शेवटच्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करत सेमीफायनलचे तिकिट काढलंय. संजू सॅमसनने (Sanju Samson) विडिंजची गोलंदाजी फोडून काढत षटकार व चौकार मारत धावांची 97 तुफानी खेळी केली. संजूने 26 चेंडूत अर्धशतक झळकविले. त्याला तिलक वर्माने जबरदस्त साथ दिली. त्याने 15 चेंडूत 27 धावांची खेळी केली. आता सेमीफायनलमध्ये भारत पाच मार्चला इंग्लंडशी भिडणार आहे.
विडिंजने दिलेल्या 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा व संजू सॅमसनने सावध सुरुवात केली. पण अभिषेक शर्मा दहा धावांवर झेलबाद झाला. तर इशान किशनही जोरदार फटकेबाजी करण्याचा नादात झेलबाद झाला. परंतु एका बाजूने सलामीवीर संजू सॅमसनने फटकेबाजी सुरूच ठेवली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या सूर्यकुमार यादवने संजूबरोबर भागीदारी केली. संजूच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने आठ षटकात 78 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार सूर्यकुमार यादव 18 धावांवर बाद झाला.
वेस्ट इंडिजची 195 धावांपर्यंत मजल
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला फलंदाजीला आमंत्रित केले. विडिंजच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. विडिंजची पहिली विकेट 68 धावांवर पडली. कर्णधार शाई होपला 32 धावांवर वरुण चक्रवर्तीने क्लिनबोल्ड केले. त्यानंतर रोस्टन चेज आणि शिमरॉन हेटमायरने जोरदार फटकेबाजी केली. हेटमायरने 12 चेंडूत 27 धावा काढल्या. रोस्ट चेजने 40, तर रोवमॅन पॉवलने 34 आणि जेसन होल्डरने 37 धावांची नाबाद खेळी. विडिंजने 4 बाद 195 धावांपर्यंत मजल मारलीय.
जसप्रीत बुमराहला दोन विकेट्स
भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.
