France Plane Crash : फ्रान्समध्ये विमान कोसळलं…11 जणांचा दुर्देवी अंत

फ्रान्सच्या ईशान्य भागातील नॅन्सी शहराजवळ विमान कोसळलं असून या अपघातात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीयं.

France Plane Crash

France Plane Crash : फ्रान्समध्ये विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना घडलीयं. फ्रान्सच्या ईशान्य भागातील नॅन्सी शहराजवळ विमान कोसळलं असून या अपघातात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीयं. या विमान दुर्घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा अपघात ‘पिलाटस पीसी-६ टर्बो पोर्टर’ (Pilatus PC-6 Turbo Porter) हे विमान कोसळल्यामुळे झाला असून हे विमान पॅराशूट प्रशिक्षण संस्थेशी संबंधित होते. विमानाचा वापर पॅराशूट जंपिंगच्या प्रशिक्षणासाठी केला जात होता.

ब्रेकिंग न्यूज: बेन स्टोक्स म्हणाला ‘गुडबाय’ ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती; इंग्लंडला मोठा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकासह विमानात असलेल्या सर्व १० जणांचा या अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच प्रशिक्षणार्थी आणि पाच प्रशिक्षकांचा समावेश होता. उड्डाणादरम्यान हे विमान अचानक कोसळले. अपघातानंतर मदत आणि बचाव पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली, परंतु कोणालाही वाचवता आले नाही. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ब्रुनो रिटेलो यांच्या नेतृत्वाखालील फ्रान्सचे गृह मंत्रालयही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री घटनास्थळाकडे रवाना झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, हवामानाची स्थिती किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हे विमान कोसळले, याचा तपास तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेल तर…, उद्धव ठाकरे यांचा खळबळजनक दावा

दरम्यान, ‘ब्लॅक बॉक्स’ आणि इतर तांत्रिक माहितीच्या विश्लेषणातूनच या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल; अलीकडच्या काळातील फ्रान्समधील सर्वात गंभीर विमान अपघातांपैकी एक म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. याव्यतिरिक्त, रविवारी २८ जून रोजी सौदी अरेबियातील ‘रास तानुरा’ भागात हेलिकॉप्टरचा एक मोठा अपघात झाला, ज्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला.

follow us