‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची टीम पोहोचली आयकॉनिक गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर
आमिर खान प्रोडक्शन्सच्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम खुमासदार अंदाजासह आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोड़पतिच्या सेटवर.
The team of ‘Happy Patel: Dangerous Detective’ on the sets of ‘Kaun Banega Crorepati’ : आमिर खान(Amir Khan) प्रोडक्शन्सचा आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसची टीम आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार अंदाजासह आयकॉनिक गेम शो कौन बनेगा करोड़पतिच्या सेटवर पोहोचली. या शोचे सूत्रसंचालन मेगास्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bachhan) करत आहेत. हॉट सीटवर मोना सिंह आणि वीर दास दिसले, तर या भागात मिथिला पालकर आणि शरीब हाशमी यांचाही सहभाग आहे. हा एपिसोड ज्ञान, विनोद आणि बेधडक गप्पांचा सुरेख संगम सादर करणारा असून सिनेमा आणि टेलिव्हिजनप्रेमींसाठी तो नक्कीच पाहण्यासारखा अनुभव ठरणार आहे.
View this post on Instagram
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसच्या ट्रेलरने मजा एका नव्या पातळीवर नेली आहे. उच्च दर्जाच्या विनोदाने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अनेक मनोरंजक आणि अनोखे क्षण पाहायला मिळतात, जे पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचे आश्वासन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता या दुहेरी भूमिकेत वीर दास आपल्या ताज्या, क्वर्की कॉमेडी स्टाइलसह भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत. ऊर्जा, आकर्षण आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतो.
आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूसचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले असून हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
