Download App

“…तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगून सरळ करणार” : अमित शाहंनी जनतेला दिलं वचन

रायपूर: छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारने (Baghel government) भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, आता इथे भाजपची (BJP) सत्ता आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ केले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी राज्यात प्रचाराची सुरुवात केली आहे. (Union Home Minister Amit Shah alleged that the Bhupesh Baghel government has broken all records of corruption in Chhattisgarh)

बघेल सरकारविरुद्ध 104 पानांचे आरोपपत्र

यावेळी अमित शहा यांनी बघेल सरकारविरुद्ध 104 पानांचे आरोपपत्र जारी केले. ते म्हणाले, बघेल यांनी छत्तीसगडला गांधी घराण्याचे ‘एटीएम’ बनवले आणि राज्याला विकासाच्या मार्गापासून दूर नेले. पण केवळ भारतीय जनता पक्षच छत्तीसगडला काँग्रेसच्या लूट, अत्याचार आणि कुशासनापासून वाचवू शकतो. छत्तीसगडमध्ये गेली पाच वर्षे घोटाळे, अत्याचार आणि आश्वासने मोडणाऱ्या सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठी आणि भाजप सरकार स्थापन करून राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी भाजपने हे आरोपपत्र जारी केले आहे, असेही ते म्हणाले.

MP Election : BJP चा इलेक्शन प्लॅन! फक्त 5 रुपयांत पोटभर जेवण; घरही फ्री

शाह म्हणाले की, छत्तीसगडच्या जनतेने भाजपला नेहमीच आशीर्वाद दिला. पक्षाने राज्यात तीन वेळा सरकार स्थापन केले. छत्तीसगडमधील भाजप सरकारने अटलजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि राज्य सुधारण्यासाठी 15 वर्षे काम केले, परंतु 2018 मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्यांनी लूट, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे सरकार स्थापन केले, त्यामुळे छत्तीसगड अडचणीत आला आहे. विकासाच्या मार्गावर प्रश्नचिन्ह उभे केले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 11 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये नऊ जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये जनतेच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा एकदा मजबूत सरकार स्थापन होईल आणि त्याआधी छत्तीसगडमध्ये पूर्ण बहुमताने भाजप सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

One Nation One Election : ‘या’ फॉर्मुल्याने 8 सरकारं पडणार; भाजपला मिळेल ‘बूस्टर’

ज्या छत्तीसगडला काँग्रेसने घोटाळे करून विकासाच्या मार्गापासून दूर नेले आणि दिल्लीच्या दरबाराचे ‘एटीएम’ बनवले, त्या छत्तीसगडला राज्यात भाजपचे सरकार स्थापन करून पुन्हा मार्गावर आणायचे आहे. मी छत्तीसगडच्या जनतेला वचन देतो की, भाजपची सत्ता आल्यास दोन वर्षांत प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘बघेल सरकार की भाजप सरकार?’

‘महादेव ऑनलाइन बुक’ या कथित बेकायदेशीर सट्टेबाजी अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा संदर्भ देत शाह यांनी, छत्तीसगडच्या जनतेला, तरुणांना ऑनलाइन बेटिंगकडे ढकलणारे बघेल सरकार हवे आहे की तरुणांचा विकास करणारे भाजप सरकार? असा सवाल केला. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे भूपेश बघेल सरकार हवे की विकासाचा मार्ग प्रशस्त करणारे भाजप सरकार हे छत्तीसगडच्या जनतेला ठरवावे लागेल, आदिवासींच्या हक्कांच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे भूपेश बघेल सरकार हवे आहे, पण जिथे धर्मांतरण फोफावते आहे, की आदिवासी आणि त्यांच्या संस्कृतीचे रक्षण आणि संरक्षण करणारे भाजप सरकार हवे आहे, हे जनतेला ठरवावे लागेल.’ असेही ते म्हणाले.

Tags

follow us