मॅडॉक फिल्म्स, कठपुतली क्रिएशन्सकडून ‘ईठा’मधील ‘जी जी रे जी’ गाण्याच्या टीझरची झलक, संपूर्ण गाणं उद्या होणार रिलीज!
मॅडॉक फिल्म्स, कठपुतली क्रिएशन्स यांनी भव्य म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील ‘जी जी रे जी’ या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.
A glimpse of the teaser for the song ‘Ji Ji Re Ji’ from ‘Eetha’ : मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स यांनी त्यांच्या आगामी भव्य म्युझिकल ड्रामा ‘ईठा’मधील ‘जी जी रे जी’ या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या टीझरमधून चित्रपटाच्या रंगतदार संगीतविश्वाची एक खास झलक पाहायला मिळते. श्रद्धा कपूर ‘ईठा’च्या भूमिकेत झळकणार असून, या गाण्यातून एका अशा कलाकाराचा जिद्दीचा प्रवास, तिचा नजाकतदार अंदाज आणि अफाट ताकद अनुभवायला मिळते, जिने पुढे जाऊन एक दंतकथा म्हणून आपली ओळख निर्माण केली.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार अजय-अतुल यांनी या गाण्याचं संगीतबद्ध, अरेंज, कंडक्ट आणि निर्मिती केली आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याला शब्दबद्ध केलं असून, श्रेया घोषाल यांच्या सुरेल आवाजाने त्याला चार चाँद लावले आहेत. म्हणजेच संगीतविश्वातील दिग्गजांची भन्नाट टीम या गाण्यासाठी एकत्र आली आहे!
मुख्य निवडणूक आयुक्तांनंतर विभागीय आयुक्तांकडे धाव; शिरूरच्या बोगस मतदार नोंदणीप्रकरणी महेबुब शेख यांची तक्रार
वैभवी मर्चंट यांच्या दमदार कोरिओग्राफीने सजलेल्या या गाण्यात श्रद्धा कपूर एका आकर्षक पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. तिच्या नृत्यातील नजाकत, भावपूर्ण डान्स मूव्ह्ज, मोहक अदाकारी आणि स्टेजवरची जबरदस्त उपस्थिती गाण्याला एक वेगळीच रंगत आणते.
‘ईठा’मध्ये संगीत हे केवळ मनोरंजनाचं साधन नसून, ते कथानकाचा अविभाज्य भाग आहे. गाण्यांच्या माध्यमातून चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेच्या भावना, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा आणि तिचा प्रेरणादायी प्रवास प्रभावीपणे उलगडला जाणार आहे. ‘जी जी रे जी’च्या टीझरने तर आत्ताच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता पूर्ण गाण्यासाठी उद्याची प्रतीक्षा!
बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची जन्मठेप स्थगित, सुप्रीम कोर्टाकडून जामीनही मंजूर
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा यांनी केली आहे. ‘ईठा’ येत्या 4 डिसेंबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.