कार्तिक आर्यनचा शहजादा ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक

कार्तिक आर्यनचा शहजादा ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक

मुंबई : भूल भूलैय्या 2 च्या दमदार यशानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक केले जात आहेत त्यामध्ये आता कार्तिक आर्यनचा शहजादा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. शहजादा हा अल्लू अर्जुनच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘अला बैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे.

अल्लू अर्जुनचा ‘अला बैकुंठपुरमलो’ हा दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये डब केलेला नाही त्यामुळे लोकांना या चित्रपटाबद्दल फार माहिती नाही. पण हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आपल्याला पाहता येऊ शकतो. ‘शहजादा’ चित्रपटातील अनेक दृश्यांची हुबेहुब कॉपी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुन व्यतिरिक्त तब्बू आणि पूजा हेगडे यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या.

कार्तिक आर्यन आणि कृति सेननची जोडी पुन्हा एकदा स्क्रीनवर जादू करण्यासाठी तयार आहे. कार्तिकच्या ‘शहजादा’ चा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना हा चित्रपट अॅक्शन आणि कॉमेडीने भरपूर असणार आहे आशी आशा आहे. ट्रेलरमध्ये कार्तिकचा डायलॉग, ‘फॅमिली पर बात आए तो डिस्कशन नहीं एक्शन करते हैं.’ चाहत्यांना खुप आवडला आहे. ‘शहजादा’ या चित्रपटाची खसियत आहे की, कार्तिक आर्यनच्या करियरमधील हा पहिला अॅक्शन चित्रपट असणार आहे.

हा चित्रपट पुढील महिन्यात म्हणजे 10 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कृति सेननची जोडी मुख्य भूमिकेत असून त्याशिवाय परेश रावल आणि राजपाल यादव यांची महत्त्वाची भूमिका आहे. तर दुसरीकडे लवकरच कार्तिक आर्यन डायरेक्टर समीर विध्वंसच्या आगामी चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ मध्ये कियारा आडवाणी सोबत दिसणार आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त कार्तिककडे सध्या ‘कॅप्टन अमेरिका’ आणि ‘आशिकी 3’ हे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube