‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन मला भेटली… ‘तिच्या’साठी आदिनाथ कोठारे भावूक

‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन मला भेटली… ‘तिच्या’साठी आदिनाथ कोठारे भावूक

Aadinath Kothare : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी मातृशोक झाला. त्यांच्या आई सरोज कोठारे यांचं निधन झालं आहे. त्यानंतर संपूर्ण कोठारे कुटुंब दुःखात आहे. त्यात आता महेश कोठारे यांचे मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे याने आपल्या आजी विषयी एक भावूक पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टमध्ये ‘जेनमा’ जायच्या आधी, स्वप्नात येऊन मला भेटली… असं म्हटलं आहे. (Aadinath Kothare Emotional post for his Grandmother who died recently )

चक्क कोर्टरुममध्येच न्यायमूर्तींनी दिला राजीनामा; नागपूर खंडपीठातील घटना

काय आहे ही पोस्ट?

आदिनाथने आपल्या आजीविषयी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टमध्ये लिहिले की, माझी आज्जी ‘जेनमा’ जायच्या एक आठवड्या आधी, माझ्या स्वप्नात येऊन मला अशी भेटली.. यावेळी त्याने एक इमेज देखील शेअर केली त्यावर लिहिले आहे की, तो त्याच्या आजीला जेनमा असं म्हणायचा. त्यात त्याने त्याला जे स्वप्न पडले. त्यात त्याची आजी त्याला भेटली. तीच्यात आणि आदिनाथमध्ये जो संवाद झाला. तो संवाद दिला आहे.

पीक विम्यात अडचणीच अडचणी, केंद्राकडे पाठपुरावा करणार; धनंजय मुडेंची माहिती

यामध्ये आदिनाथची आजी म्हणते, ‘चल आदिनाथ, उठ, मी येते’. त्यावर आदिनाथ म्हणतो, ‘कुठे?’ आजी म्हणते, ‘महेश निलिमाला सांगून येते…’ आदिनाथ म्हणतो, ‘नको अशीच बस’, आजीने आदिनाथचं डोक मांडीवर घेतलेलं असल्याने ती म्हणते ‘जड आहे डोक तुझं, पाय दुखले माझे’, पण आदिनाथ म्हणतो ‘मला गोष्ट सांग’, त्यावर आजी म्हणते, ‘आता तुच सांगत जा माझ्या’ गोष्टी तरी आदिनाथ म्हणतो ‘सांग ना…’ असा हा स्वप्नातील संवाद शेअर केला आहे. दरम्यान सध्या कोठारे कुटुंब आई आणि आजीच्या निधनातून सावरत आहे. त्यांच्या एक एक आठवणी ते अशाप्रकारे शेअर करत असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube