… म्हणून शर्मन जोशीने दिल्या ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ मराठी सिरीयलला शुभेच्छा!

… म्हणून शर्मन जोशीने दिल्या ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ मराठी सिरीयलला शुभेच्छा!

Marathi Serial : सन मराठी या मराठी वाहिनीवरील मराठी सिरीयल ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ला हिंदीतील अभिनेते शर्मन जोशी यांनी एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेतील बाबी रेडकर ही भूमिका साकराणारे अभिनेते राजेश भोसले हे शर्मन जोशी यांचे खास मित्र आहेत. त्यांनी यावेळी या मालिकेसाठी राजेश यांच्यासह मालिकेच्या टीमला एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. ( Actor Sharman Joshi Wishes to Marathi Serial Kshetrapal shri deva vetoba )

Photos : ‘गदर 2’ मध्ये नसणार गदरमधील हे अभिनेते; कोणी-कोणी घेतला जगाचा निरोप, पाहा…

काय म्हणाले शर्मन जोशी?
मी माझ्या खास मित्र राजेश भोसलेला त्याच्या ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ या सिरियलसाठी शुभेच्छा देत आहे. ही सिरीयल खुप यशस्वी झाली आहे. लोकांकडून या सिरीयलला आणि राजेशला प्रेम मिळत आहे. त्यामुळे राजेश आणि टीमला खुप खुप शुभेच्छा आणि असंच यश मिळत राहो. असं म्हणत त्यांनी या मालिकेसाठी राजेश यांच्यासह मालिकेच्या टीमला एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

या व्हिडीओबद्दल स्वतः राजेश यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. राजेश म्हणाले की, नमस्कार मंडळी ह्या आमच्या कलाक्षेत्रात मी माझी कला ज्या ज्या माध्यमातून मी सादर करतो. तेव्हा आमचा रसिक माय बाप, कुटुंब, मित्र मंडळी सगळे कौतुकाची थाप देतात. आशीर्वाद देतात शाब्बासकी देतात. प्रोत्साहन देतात त्यावेळी मी सर्वांचा मनापासून आभारी असतो. कारण त्याने काम करायला आणखी ऊर्जा मिळते.

कर्नाटकच्या तिजोरीत खडखडाट! आमदारांना निधी मिळणार नाही; शिवकुमारांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

त्यातलीच ही एक कौतुकाची थाप, प्रोत्साहन, शाब्बासकी व्हिडीओ मार्फत दिलीये ते तुमचा आमचा सगळ्यांनचा लाडका उत्तम कलाकार उत्तम माणूस एक उत्तम आमचा मित्र शर्मन जोशी यांनी वेळात वेळ काढून मी सध्या करत असेलेल्य सन मराठी वरील ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ह्या मालिकेसाठी मला आणि आमच्या टीम ला शुभेच्छा दिल्या आणि काम करायला आणखी एक नवी ऊर्जा दिली. शर्मन जोशी खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून शुभेच्छा दिल्या प्रोत्साहन दिलस धन्यवाद.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube