लेखक, संगीत दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन

Vivek Lagoo :  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामामुळे चाहत्यांचे मनात एक वेगळी ओळख निर्माण करणारे जेष्ठ अभिनेते विवेक लागू

Vivek Lagoo

Vivek Lagoo :  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या कामामुळे चाहत्यांचे मनात एक वेगळी ओळख निर्माण करणारे जेष्ठ अभिनेते, लेखक आणि संगीत दिग्दर्शक विवेक लागू यांचे आज (19 जून) निधन झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विवेक लागू (Vivek Lagoo) यांच्या पार्थिवावर मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील ओशिवरामधील स्मशान भूमीत 20 जून रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. मात्र विवेक लागू यांचे निधन कोणत्या कारणाने झाले आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

विवेक लागू हे अभिनेत्री-लेखिका मृण्मयी लागू यांचे वडील आहे. तर दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती होते.  विवेक लागू यांनी  टीव्ही चित्रपट ‘गोदावरीने काय केले’ (2008), ‘अग्ली’ (2013), ‘व्हॉट अबाउट सावरकर’ (2015), ’31 दिवस’ (2018) मध्ये उल्लेखनीय काम केले आहे. तर त्यांच्या ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या मालिकाही गाजल्या होत्या.

युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, बाळासाहेबांनी मिरचीची धुरी दिली असती; उपमुख्यमंत्री शिंदे भडकले 

follow us

संबंधित बातम्या