‘Baby on Board’ ६ वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीने शेअर केलं प्रेग्नेंन्सी फोटोशूट

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 01T124150.102

Ishita Dutta Pregnancy: ‘दृश्यम २’ (Drishyam 2) या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री इशिता दत्ता (Actress Ishita Dutta) लवकरच आई होणार आहे. (pregnant) आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाचा क्षण असतो. अजय देवगणची ऑनस्क्रिन लेक इशिता दत्ता आता खऱ्या आयुष्यामध्ये आई होणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) तिच्या प्रेग्नेंन्स काही फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

फोटो शेअर करताना ती आपलं बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. इशिता आपला नवऱ्या बरोबर बीचवर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दोघेही मॅचिंग आऊटफिट घातलेले दिसत आहे. या रोमँटिक कपलने फोटो शेअर करताना, ‘Baby on Board..’ असं पोस्टला कॅप्शन दिलं आहे. त्याला प्रेक्षकांनी आणि सेलेब्सनी दोघांवर अभिनंदनचा मोठा वर्षाव केला.

आतापर्यंत या फोटोंना हजारो लाईक्स आणि कॉमेंट्स मिळाले आहेत. इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठबरोबर प्रेमविवाह केला होता. दोघांनी २०१७ मध्ये मोठ्या दिमाखात लग्न केले होते. लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत, हे रोमँटिक कपल आता आई- बाबा होणार आहेत.

बॉलिवूडचा बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले…

यामुळे या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसून येत आहेत. इशिता ही बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्हीमध्ये चित्रपटाच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. इशिता ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. लग्नानंतर ६ वर्षांनी या जोडप्याने गुडन्यूज दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube