त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर..अभिनेत्री नविना बोलेनचे दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप

Actress Navina Bolen Accuses Sajid Khan : अभिनेत्री नविना बोलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक साजिद खानवर धक्कादायक आरोप केले आहेत. नविना ‘इश्कबाज’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे. (Sajid Khan) ऑडिशनच्या बहाण्याने बोलावून साजिद खानने तिला कपडे काढण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप नविनाने केला आहे.
एक अत्यंत भयानक माणूस आहे, ज्याला मला पुन्हा कधीच आयुष्यात भेटायचं नाहीये आणि त्याचं नाव साजिद खान आहे. महिलांचा अनादर करण्याच्या बाबतीत त्याने खरोखरच मर्यादा ओलांडल्या आहेत. ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी त्याने मला बोलावलं होतं आणि मी खूपच उत्सुक होते. जेव्हा मी ऑडिशनला गेले, तेव्हा त्याने मला कपडे काढून त्याच्यासमोर अंतर्वस्त्रामध्ये बसण्यास सांगितलं. तू किती कम्फर्टेबल आहेस, हे मला पहायचंय, असं तो म्हणाला होता असंही ती यावेळी म्हणाली.
साजिदच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित होताच नविनाने तिथून ती बाहेर पडली. ‘सुदैवाने इमारतीच्या खाली माझी कोणीतरी प्रतीक्षा करत होतं. साजिदला काय उत्तर द्यावं हेच मला समजत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तो म्हणाला. काय झालं? तू स्टेजवर बिकिनी घालतेस, मग काय समस्या आहे? हे सर्व त्याच्या भाषेत बकवास आहे. त्याला काय सांगावं हे मला कळत नव्हतं. अखेर मी त्याला म्हटलं की जर तुला हेच पहायचं असेल तर मला घरी जाऊन बिकिनी घालावी लागेल आणि मी आता कपडे नाही काढू शकत. कसंबसं मी तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले असंही ती यावेळी म्हणाली. त्यानंतर त्याने मला कमीत कमी 50 वेळा फोन केले असंही ती म्हणाली.
या घटनेच्या वर्षभरानंतर साजिदने पुन्हा नविनाला संपर्क केला होता. त्यावेळी नविना ‘मिसेस इंडिया’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेत होती. “त्याने मला पुन्हा फोन केला आणि म्हणाला, तू काय करतेस, एखाद्या भूमिकेसाठी तू मला भेटायला ये. तेव्हाच मला समजलं की हा माणूस अनेक महिलांना अशाप्रकारे फसवत असणार. त्यामुळेच त्याला हे आठवलंसुद्धा नाही की वर्षभरापूर्वीच त्याने मला फोन करून त्याच्या घरी बोलावलं होतं आणि माझ्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागला होता”, असं नविना पुढे म्हणाली.