महाराष्ट्र दिनानिमित्त प्राजक्ता माळीची खास पोस्ट; म्हणाली हा जन्म…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T191711.296

Prajakta Mali :  आज १ मे अर्थात महाराष्ट्र दिन व कामगार दिन आहे. राज्यभर आजचा दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला आहे. त्याच निमित्ताने मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्ट शेअर करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती आपल्या विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने केलेल्या पोस्टमुळे सर्वांचे लक्ष तिच्या या पोस्टकडे वेधले गेले आहे. प्राजक्ता माळीने आपल्या इंस्टाग्राम हॅन्डल वरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने मराठमोळ्या पारंपारिक पोशाखामध्ये सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पडद्यावर उडणार रांगड्या बैलगाडा शर्यतीचा धुराळा

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…युगानुयुगे, मनामनात…हाच जयघोष व्हावा… महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा जन्म कामी यावा..“महाराष्ट्र दिन” आणि ‘कामगार दिनाच्या” खूप शुभेच्छा..“मुंबई- महाराष्ट्रात” बसून हे लिहीताना किती अन् काय काय वाटतय; हे शब्दात मांडू शकत नाही,” असं कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता माळी ही मराठीतील ख्यातनाम अभिनेत्री आहे. तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये तसेच वेब सिरीज व मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

Tags

follow us