Adipurush Review : रामायण की सुपरहिरो फिल्म? रामायणातील कथेचा आत्मा हरवलेला सिनेमा

Adipurush Review : रामायण की सुपरहिरो फिल्म? रामायणातील कथेचा आत्मा हरवलेला सिनेमा

प्रेरणा जंगम

Adipurush Review: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रामायणावर आधारित असून लहानांपासून मोठ्यांना माहिती असलेली ही पौराणीक कथा रुपेरी पडद्यावर वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Adipurush Review) अभिनेता प्रभास श्री रामाची भूमिका साकारतोय. तर क्रिती सनॉन ही सीतेची, सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत, देवदत्त नागे बजरंगबली हनुमानाच्या भूमिकेत आहे. (Prabhas)रामायण म्हटलं की रामानंद सागर यांची रामायण ही मालिका आठवते. त्यातील राम-सीता, लक्ष्मण यांचं तेजस्वी रुप, त्यांचा साधेपणा यातच भक्तिभाव होतं. ते बघताना श्रद्धेची, भक्तिची भावना सहज यायची.

परंतु ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषच्या बाबतीत असं होतयं का ? तर आदिपुरुषमध्ये ती भावनाच हरवलेली जाणवते. चित्रपट पाहताना कथा जरी रामायणची असली तर अजीबातच रामायण रुपेरी पडद्यावर पाहत असल्याची भावना येत नाही. रामायणाच्या कथेचा आत्मा या चित्रपटात कुठेतरी हरवला आहे. याची विविध कारणं आहेत. चित्रपटाची कथा सगळ्यांना माहिती असलेली आहे. त्यामुळे विविध कॅरेक्टर्स चित्रपटात समोर येत असताना उत्सुकता लागून राहते की त्या त्या भूमिका कशा असतील. मात्र अनेक ठिकाणी अपेक्षाभंग होत आहे. हा चित्रपट हॉलीवुड चित्रपटांसारखा चकचकीत, उत्तम व्हिएफक्स करण्यात दिग्दर्शकाकडून कलाकारांचा अभिनय, संवाद या गोष्टींकडे दुर्लक्ष झालय असं जाणवतं आहे.

फिल्मचे संवाद अजीबात प्रभावी वाटत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चित्रपटाचा कलर टोन खटकणारा वाटतो. चित्रपटातील काही एक्शन सीन पाहताना मार्वल चित्रपटांची कॉपी केल्याचं जाणवतं. चित्रपटातील काही सीन्सचं उत्तम सादरीकरण केलय. रावणाने केलेलं सीताहरण, बजरंगबली हनुमान संजीवनी आणतात तो सीन असेल किंवा इतर सीन याचं सादरीकरण छान झाले आहे. चित्रपटातील पात्रांची नावं राघव, जानकी, शेष अशी ठेवण्यात आली. चित्रपटाच्या सुरुवातील सांगितल्या प्रमाणे रामायण पासून प्रेरित म्हणत अशी नावे देण्यात आली आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

अभिनेता प्रभास हा राघव या भूमिकेत खटकतोय. आदर्श, वीर योद्धा राम म्हणजेच राघवच्या भूमिकेत समरस होण्यात प्रभास कमी पडलाय. जनकीच्या भूमिकेत क्रिती सनॉनचे प्रयत्न कमी पडले आहेत. इतर चित्रपटांमध्ये जशी ती भूमिका साकारते तसाच तोच तोच अभिनय जाणवतो. तिच्या चेहऱ्यावर तेज, भाव अजिबात जाणवत नाहीत. शेषच्या भूमिकेत सनी सिंहचे कास्टिंग अतिशय चूकीचे वाटते. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत बऱ्यापैकी लक्ष वेधून घेतोय. सैफ रावणाच्या भूमिकेत अनेक ठिकाणी लक्षवेधी ठरतो. बजरंगच्या भूमिकेत देवदत्त नागेचं काम चांगलं झाले आहे, त्याची पिळदार शरीरयष्ठी आणि प्रभू श्रीरामाच्या प्रती असलेली भक्ती त्याच्या चेहऱ्यावर झळकते. अभिनेत्री तेजस्विनी पंडीत ही रावणाची बहीण शुर्पणखेच्या भूमिकेत लक्ष वेधून घेते.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

या चित्रपटाचा सेकन्ड हाल्फ म्हणजे उत्तरार्ध एक्शन सीन्सने भरलेला आहे. त्यामुळे तो खिळवून ठेवतो. हा चित्रपट बच्चेकंपनीला आवडण्याची मोठी शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे चित्रपटातील व्हिएफएक्स आणि एक्शन सीन्स. चित्रपटातील व्हीएफएक्स चांगले करण्यात आलेत. चित्रपटाचं छायांकन जमेची बाजू वाटतं. चित्रपटाची गाणी, संगीत, पार्श्वसंगीत कथेला शेवटपर्यंत जोडून ठेवतं. अजय – अतुल यांची गाणी लक्षवेधी आहेत. चित्रपटाचा तीन तासांचा कालावधी लांबवलेला जाणवतो आणि काही ठिकाणी कंटाळवाणा वाटू शकतो. बच्चेकंपनीला, लहान मुलांना हा चित्रपट आवडू शकतो. रामायणाचे हटके आधुनिक सादरीकरण या चित्रपटात करण्यात आलय मात्र काही ठिकाणी ते खटकणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube