गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चित्रपट येणार मराठी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीला !

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai- मनाला भिडणारा मराठी कौटुंबिक चित्रपट 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ 19 मार्चपासून मराठी झी ५ वर

  • Written By: Published:
Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai 2026

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai 2026: केदार शिंदे दिग्दर्शित आणि Zee Studios व Sunflower Studios यांच्या सहयोगाने निर्मित हा मनाला भिडणारा मराठी कौटुंबिक चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ 19 मार्चपासून मराठी झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यावर्षी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या मराठी कौटुंबिक चित्रपट असलेल्या “अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ! आता मराठी ZEE5 वर डिजिटल प्रीमियर होणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित आणि Zee Studios व Sunflower Studios यांच्या सहयोगाने निर्मित हा चित्रपट सासू आणि सुनेमधील नात्याचा सुंदर आणि भावनिक पैलू उलगडून दाखवतो.

हास्य, आपुलकी आणि भावनिकतेचा सुंदर संगम असलेली ही कथा नवविवाहित मानस्वी आणि तिची सासू स्मिता यांच्याभोवती फिरते. सुरुवातीला व्यक्तिमत्त्वातील संघर्षाने सुरू झालेला हा प्रवास हळूहळू समज, स्वीकार आणि अनपेक्षित मैत्रीत बदलतो. दैनंदिन प्रसंग, खुमासदार संवाद आणि हृदयस्पर्शी क्षणांमधून हा चित्रपट दाखवतो की सहानुभूती आणि एकत्र अनुभवांमुळे कौटुंबिक नाती कशी अधिक घट्ट होत जातात.

निर्मिती सावंत , प्रार्थना बेहेरे, राजन भिसे आणि नकुल घाणेकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहात आपल्या रंजक कथानक आणि प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली. आता डिजिटल प्रीमियरमुळे हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून कुटुंबासोबत पाहण्याचा एक मनोरंजक आणि मनमोहक अनुभव देणार आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले “ही कथा आपल्या घरातील अगदी ओळखीच्या वातावरणातून जन्माला आली आहे सासू आणि सुनेमधील खोडकर चकमकी, मतभेद आणि शेवटी निर्माण होणारी समजूत. विनोद आणि भावनांमधून आम्हाला अशा नात्याची गोष्ट सांगायची होती जी ठराविक साचे मोडून कुटुंबात महिलांची ताकद आणि भूमिका दाखवते.”

अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या “या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात जरी विनोद आणि संघर्षाने होत असली तरी पुढे तो दोन स्त्रिया एकमेकींना समजून घेण्याचा अतिशय भावनिक आणि स्तरित प्रवास दाखवतो. स्मिताची भूमिका साकारणं खूप मजेशीर होतं कारण ती मजबूत, स्पष्टवक्ती आणि खूप खरी वाटणारी व्यक्तिरेखा आहे.”

प्रार्थना बेहेरे सांगते “मानस्वी ही लग्नानंतर नव्या कुटुंबातील नातेसंबंध समजून घेणाऱ्या अनेक तरुण स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. हा चित्रपट दाखवतो की नाती सुरुवातीपासून परिपूर्ण नसतात, पण संयम आणि समजूतदारपणामुळे ती खूप सुंदर आणि अर्थपूर्ण बनू शकतात. आता हा प्रवास ZEE5 वर प्रेक्षकांना अनुभवता येणार याचा मला खूप आनंद आहे”

विनोद, भावना आणि आपुलकीने भरलेले कौटुंबिक क्षण यांचा सुंदर मेळ असलेला “अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई ? “हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक आनंददायी अनुभव ठरणार आहे.

19 मार्चपासून, फक्त मराठी ZEE5 वर ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चा डिजिटल प्रीमियर पाहायला विसरू नका

follow us