Welcome 3 Anil Kapoor : ‘या’ कारणामुळे अनिल कपूर वेलकम 3 मध्ये नसणार

Welcome 3 Anil Kapoor : ‘या’ कारणामुळे अनिल कपूर वेलकम 3 मध्ये नसणार

Welcome 3 Anil Kapoor : ‘वेलकम 3’ (Welcome 3 ) ची घोषणा झाल्यावर अनेकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चा देखील करण्यात आली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत असल्याचे चर्चा बघायला मिळत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. ती म्हणजे अभिनेते अनिल कपूर ( Anil Kapoor) वेलकम 3 मध्ये नसणार आहेत.

<Chandrayaan 3 Landing : ‘अनेक दशकांच्या अथक परिश्रमांचं..,’; राहुल गांधींकडूनही इस्त्रोचं अभिनंदन/a>

…म्हणून अनिल कपूर वेलकम 3 मध्ये नसणार

वेलकम 3 (Welcome 3 ) मधून अनिल कपूर ( Anil Kapoor ) आणि नाना पाटेकर बाहेर पडल्याच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे आणि इथून चर्चांना उधाण आलं आहे. आर्थिक समस्यांमुळे हे दोघे वेलकम 3 चा भाग नसल्याची नोंद करण्यात आली होती परंतु असे दिसून आले की खरे कारण काहीतरी वेगळं आहे.

Chess World cup 2023 Final : प्रज्ञानानंदने आजही कार्लसनला रोखलं; उद्या पुन्हा होणार निर्णायक लढत

सूत्रा नुसार ‘अनिल कपूरने (Anil Kapoor) वेलकम 3 (Welcome 3) न करण्याचे कारण म्हणजे वेलकम 2 बनवताना फिरोज नाडियाडवालाचे अव्यावसायिक वर्तन होते. वरवर पाहता उत्पादनाचे व्यवस्थापन चुकीचे झाले होते. पेमेंट ला उशीर झाला आणि टीडीएस देखील दिला गेला नाही ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले. फक्त मिस्टर कपूरच नाही तर इतर अभिनेते आणि लोकांना ही समस्या आली असल्याने यंदाचा वेलकम 3 चा ते भाग होणार नसल्याचं कळतंय”

वेलकमला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर दुसऱ्या भागाने चाहत्यांना निराशा केल्याचे बघायला मिळाले होते. ‘वेलकम’च्या दुसऱ्या भागामध्ये जॉन अब्राहम आणि श्रृती हसनने हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. नुकतंच निर्मात्यांनी ‘वेलकम 3’ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखेची माहिती देखील देण्यात आली आहे.येणाऱ्या 2024 मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून ‘वेलकम 3’ची चर्चा जोरदार सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube