Chandrayaan 3 Landing : ‘अनेक दशकांच्या अथक परिश्रमांचं..,’; राहुल गांधींकडूनही इस्त्रोचं अभिनंदन

Chandrayaan 3 Landing : ‘अनेक दशकांच्या अथक परिश्रमांचं..,’; राहुल गांधींकडूनही इस्त्रोचं अभिनंदन

Chandrayaan 3 Landing : जगभरातील सर्वांचच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-3 अखेर चंद्रावर सुरक्षित पोहचलं आहे. आज सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी चंद्रावर चांद्रयान-3 यशस्वीपणे लॅंडिंग झालं आहे. यासंदर्भात इस्त्रोकडून घोषणा करण्यात आली असून भारतीयांची मान उंचावणारी ही बाब आहे. इस्त्रोच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे, अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनीही इस्त्रोच्या टीमच अभिनंदन केलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

ऐतिहासिक! भारताची ‘दक्षिण’ दिग्विजय मोहिम फत्ते; चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग

राहुल गांधी यांनी ट्विट केलं की, “इस्रो टीमचे अभिनंदन. चांद्रयान 3 चे दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग हे आपल्या शास्त्रज्ञांच्या अनेक दशकांच्या मेहनतीचा परिणाम आहे. “1962 पासून, भारताचा अंतराळ विभाग नवीन उंची गाठत असू स्वप्न पाहणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

2011 चा विश्वचषकात धोनीमुळे रोहित शर्माला डावललं; 12 वर्षांनंतर निवडकर्त्याचा मोठा खुलासा

दरम्यान, चांद्रयान-2 च्या अपयशानंतर आता चांद्रयान-3 मोहिम इस्त्रोकडून आखण्यात आली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर या चांद्रयानाचं सॉफ्ट लॅंडिंग करुन इस्त्रोने जगात एक मोठा इतिहास रचला आहे. इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीममुळेच आज भारताने चंद्रावर तिरंगा झेंडा फडकवण्याचा इतिहास रचला आहे.

रशिया, चीन, अमेरिकेनंतर चंद्रावर झेंडा रोवणारा भारत चौथा देश ठरला आहे. वर्षानुवर्षे कार्यरत असलेली इस्रोची टीम या मिशनमागे आहे. ज्या टीममुळे चांद्रयान मिशन-3 लाँच करण्यात आले. इस्रोची तिसरी चंद्र मोहीम मागील दोन मोहिमांपेक्षा खूपच वेगळी आहे. इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमच्या मेहनतीमुळेच या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube