2011 चा विश्वचषकात धोनीमुळे रोहित शर्माला डावललं; 12 वर्षांनंतर निवडकर्त्याचा मोठा खुलासा

2011 चा विश्वचषकात धोनीमुळे रोहित शर्माला डावललं; 12 वर्षांनंतर निवडकर्त्याचा मोठा खुलासा

Rohit Sharma Dropped In 2011 ODI World Cup : टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. असं असलं तरी 2011 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीमुळे (Mahendra Singh Dhoni) रोहित शर्मा(Rohit Sharma) वनडे वर्ल्ड कप खेळू शकला नव्हता. माजी निवडकर्ता राजा व्यंकट यांनी ही माहिती दिली. राजा व्यंकट यांनी सांगितले की, रोहित शर्माची त्यावेळी निवड झाली नव्हती कारण कर्णधार एम एस धोनीला रोहितच्या जागी पीयुष चावलाची (Piyush Chawla)निवड करायची होती. संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही रोहितचा भारतीय संघात समावेश करणार होते. मात्र धोनीने जेव्हा वेगळी मागणी केली त्यावेळी गॅरी यांनीही धोनीच्या निर्ययाला होकार दिला.

Tuljapur accident : भाविकांवर काळाचा घाला! ट्रक आणि कारची जबर धडक, 4 ठार, सहा जखमी

जेव्हा रोहित शर्माला संघामध्ये स्थान नसल्याचे समजले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. कारण रोहितचा नेहमीच वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय सहभाग असायचा. त्याचबरोरबर 2007 च्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियात रोहित शर्मा सहभागी होता. मीडियाशी बोलताना व्यंकट यांनी सांगितले की, जेव्हा संघ निवडीबाबत चर्चा करत होतो, त्यावेळी रोहित शर्मा खेळाडूंच्या सिलेक्शनच्या रेसमध्ये होता. जेव्हा आम्ही संघाची निवड प्रक्रिया सुरु केली, त्यावेळी 1 ते 14 पर्यंतच्या सर्व खेळाडूंना सामील केलं. रोहित शर्मा 15 वा खेळाडू असेल असाही पर्याय दिला.

Dream Girl 2 ने केला मोठा धमाका; प्रदर्शित होण्याआधीच तब्बल इतक्या लाखांचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग

गॅरी कर्स्टन यांना वाटलं की, हा सर्वात चांगला पर्याय आहे. मात्र एम एस धोनीने त्यावेळी बदल करण्याची मागणी केली. त्यांना रोहित शर्माच्या जागी पीयूश चावलाला संधी द्यायची होती. त्यानंतर करत गॅरी कर्स्टन म्हणाले की, पीयुषचा पर्यायही चांगला आहे. त्यामुळेच रोहित शर्माला संघामध्ये जागा मिळाली नाही.

2023 चा विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वर्ल्ड कप आणि आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

विशेष म्हणजे टीम इंडिया 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडिया एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळणार आहे, जो 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube