स्वतःला भाग्यवान समजतो की, आशाताईंसोबत… ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने शेअर केली आठवण
Asha Bhosale यांच्या निधनानंतर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यांनी देखील शोक व्यक्त केला.
Australian cricketer brett lee shares memories of being with Asha Bhosale : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं 28 एप्रिल रोजी दुपारी निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 11 एप्रिलच्या रात्री दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांच्यावर सुरु असणाऱ्या उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांनी मराठी भाषेसह विविध भाषेत 12 हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहे. त्यांच्या निधनानंतर माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली यांनी देखील शोक व्यक्त केला. यावेळी त्यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये आशाताईंची एक खास आठवण शेअर केली आहे.
View this post on Instagram
काय म्हणाले ब्रेट ली?
2006 साली मला आशा भोसले यांच्यासोबत ‘यू आर द वन फॉर मी’ हे गाणे लिहिण्याचा आणि रेकॉर्ड करण्याचा आनंद मिळाला होता. ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल मी नेहमीच अत्यंत कृतज्ञ राहीन.माझ्या मनात सर्वात जास्त घर करून राहिली ती केवळ त्यांची विलक्षण प्रतिभाच नव्हे, तर त्यांचा दयाळूपणा आणि नम्रपणा. आयुष्यात एवढे यश मिळवूनही, त्या अत्यंत आपुलकीने आणि उदारतेने वावरत होत्या. या कठीण काळात माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत आहेत. इतक्या खास व्यक्तीसोबत एक छोटासा क्षण जरी घालवता आला, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.यात काही शंका नाही की त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत जिवंत राहील.
डॉ. मंदार उमेश दाभाडे आत्महत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर; काय घडलं?
महाराष्ट्रातील सांगलीमध्ये 8 सप्टेंबर 1933 जन्मलेल्या भोसले या पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या तिसऱ्या कन्या होत्या. त्यांचे वडील शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते. लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना मंगेशकर-खाडीकर ही त्यांची भावंडं होती. त्यांनी पहिलं गाणं 1943 मध्ये एका मराठी चित्रपटात गायलं होतं. त्यांनी ते गाणं आपली बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत गायलं होतं. पुढे, वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी ‘रात की राणी’ या चित्रपटासाठी आपलं पहिलं सोलो गाणं गायलं. आशाताईंनी त्यांच्या ‘Asha Bhosle : A Life In Music या बायोग्राफीमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलंय.