Udta Teer : ‘उडता तीर’ बद्दल आयुष्मान खुरानाचा सर्वात मोठा खुलासा
Udta Teer : दुसऱ्या ट्रेलरमधून कॉमेडी, अॅक्शन आणि मनोरंजनाचा आणखी मोठा डोस देणारा उडता तीर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर मनोरंजनाने भरलेला
Udta Teer : दुसऱ्या ट्रेलरमधून कॉमेडी, अॅक्शन आणि मनोरंजनाचा आणखी मोठा डोस देणारा उडता तीर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर मनोरंजनाने भरलेला अनुभव देण्याचं आश्वासन देतो. आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आपल्या प्रकारातील पहिला पेट्रियोटिक कॉमेडी चित्रपट आहे. कॉमिक गोंधळ, धमाल प्रसंग आणि प्रत्येक वळणावर मिळणारे सरप्राइजेस अशा अनोख्या विश्वात हा चित्रपट प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे.
चित्रपटाच्या अनोख्या कॉमिक विश्वाबद्दल बोलताना आयुष्मान खुराना म्हणतो, “उडता तीरची कथा नेमकी कुठे जाणार आहे, हे समजलंय असं तुम्हाला वाटत असतानाच एक नवं वळण येतं. माझ्यासाठी या चित्रपटाचा खरा हिरो म्हणजे त्याचा अनोखा आणि वेगवेगळ्या जॉनरना एकत्र आणणारा विषय. आपण देशभक्तीवर आधारित चित्रपट, अॅक्शनपट आणि कॉमेडी चित्रपट पाहिले आहेत; पण या तिन्ही गोष्टी इतक्या मजेशीर आणि पारंपरिक चौकटींपलीकडच्या पद्धतीने एकत्र आणणं, हा असा अनुभव आहे जो प्रेक्षकांनी याआधी फारसा पाहिलेला नाही. हे विश्व साकारताना आम्ही खूप मजा केली आहे. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांनाही त्यातील सरप्राइजेस, धमाल आणि हास्याचा भरपूर आनंद मिळेल, याची मला खात्री आहे.”
वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करण्यासाठी आणि हटके कथा निवडण्यासाठी ओळखला जाणारा आयुष्मान या चित्रपटातून पुन्हा एकदा कॉमेडीकडे वळत आहे. एका अनोख्या पार्श्वभूमीवर विनोद आणि अॅक्शन यांची सांगड या चित्रपटात घालण्यात आली आहे. नवा ट्रेलर सरप्राइजेस आणि खळखळून हसवणाऱ्या प्रसंगांनी भरलेल्या थिएट्रिकल अनुभवाची झलक दाखवतो.
‘पीस बॉन्ड’ म्हणजे काय? उल्लंघन केल्याने CJP नेत्यांना अटक –
या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्यासोबत मुकुल देव, राम कपूर, रघुबीर यादव, बृजेन्द्र काला, गुलशन ग्रोव्हर, सुहैल नैय्यर, राहुल बोस आणि सुप्रिया पिळगावकर हे कलाकारही झळकणार आहेत. आकाश ए. कौशिक यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. करण जोहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. उडता तीर 23 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.