बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी! सलमानचा स्वॅग, पूजाची स्टाइल अन्…

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी! सलमानचा स्वॅग, पूजाची स्टाइल अन्…

Baba Siddique Iftar Party Videos: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी मुंबईत चित्रपट, टीव्ही आणि सोशल मीडिया जगतातील अनेक स्टार्ससाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. (Baba Siddique Iftar Party) मुंबईत झालेल्या या इफ्तार पार्टीत अनेक स्टार्सची गर्दी झाली होती. नेहमीप्रमाणे यावेळीही बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान म्हणजेच सलमान खानने (Salman Khan) या इफ्तार पार्टीची शोभा वाढवली.

यावर्षी सलमान खानचे वडील सलीम खान, बहिणी अलविरा आणि अतुल अग्निहोत्री, अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्यासह अनेक कुटुंबातील सदस्य इफ्तार पार्टीत -पाहायला मिळाले आहे. यावेळी सोहेल खानचा मुलगा निरन खानने आपल्या वागण्याने सर्वांची मने जिंकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


सलमान खानची ग्रँड एन्ट्री

सलमान खान हा असा व्यक्ती आहे, जो बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला गेली अनेक वर्षे सतत हजेरी लावतो. सलमानने यावेळीही तसेच केले. सलमान पठाणी कुर्त्यामध्ये बघायला मिळाला आहे. त्याचा लुक पॉवरफुल दिसत होता. यावेळी सलमानने तिथल्या पापाराझींसाठी पोजही दिली आणि बाबा सिद्दीकी आणि जीशान सिद्दीकी यांच्यासोबत फोटोही काढले.

यावर्षी सलमान खानचा पुतण्या आणि सोहेल खानचा मुलगा निरवान खाननेही इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी तो ब्लॅक शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. निरवानला पोहोचल्यावर त्याला पूजा हेगडे तिथे दिसली. त्याने पूजा हेगडेसोबत पापाराझीसाठी पोज दिली. यादरम्यान, त्याचे वागणे पाहून सर्वजण तोंडभरून कौतुक करत होते. विशेष म्हणजे निरवचे हे वागणे पाहून चाहत्यांना सलमान खानची आठवण झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


इम्रान खानचा केक कापला

24 मार्च रोजी इम्रान खान यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीही त्यांनी त्यांच्या निमंत्रणावरून बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. बाबा सिद्दीकी यांनीही आपण उत्कृष्ट यजमान असल्याचे सिद्ध केले. इमरान हाश्मीसाठी त्याने आधीच वाढदिवसाच्या केकची व्यवस्था केली होती. तिथे पोहोचल्यावर इमरान हाश्मीने केक कापला आणि सर्वांना खाऊ घातला.

‘आता योग्य वेळ आलीये..’; 4 राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या बॉलिवूडची ‘क्वीन’ची राजकारणात एन्ट्री

तसेच आपल्या रॅप आणि गायनाने सर्वांना वेड लावणारा हनी सिंग यावेळी इफ्तार पार्टीतही दिसला. हनी सिंगने हिरव्या रंगाचा जुब्बा परिधान करून पार्टीत प्रवेश केला. यावेळी त्यांची ओरीसोबत धडक झाली. हनी सिंगने लगेच ओरीला मिठी मारली आणि या वर्तनामुळे ओरीला देखील धक्काच बसला.

या स्टार्सशिवाय इफ्तार पार्टीत शिल्पा शेट्टी, श्वेता तिवारी, एमसी स्टेन, मुनावर फारुकी, माहिरा शर्मा, शहनाज गिल, सुनील शेट्टी, उर्वशी रौतेला, श्रिया सरन, अंकिता लोखंडे, अली गोनी आणि जस्मिन भसीन, प्रीती झिंटा, मन्नारा चोप्रा यांचा समावेश होता. जन्नत, सना खान, जरीन खानसह अनेक स्टार्स दिसले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज