Baipan Bhaari Devaची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; १४ दिवसात कमावले इतके कोटी रूपये

Baipan Bhaari Devaची बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई; १४ दिवसात कमावले इतके कोटी रूपये

Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स आफिसवर चांगलंच धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आहेत. तसेच या सिनेमाची जोरदार चर्चा देखील रंगत असल्याचे दिसून येत आहे. मग ते सिनेमागृह असो वा महिला मंडळ सर्वजणच या सिनेमाला हजेरी लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

तसेच चाहत्यांच्या पसंतीस उतरण्याबरोबरच बॉक्स ऑफिसवर (box office) देखील जोरदार धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने चांगलाच गल्ला कमावला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाने रिलीजच्या १४ दिवसांत ३६.७८ कोटींची तगडी कमाई केली आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट, जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर दिवसेंदिवस या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये (Box Office Collection) वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

‘बाईपण भारी देवा’ या मराठी सिनेमाचा टार्गेट ऑडियन्स हा महिलावर्ग असल्याचे दिसून येत आहे. भजनीमंडळ, महिला बचत गट, किटी पार्टी ग्रुप असे महिलांचे अनेक वेगवेगळे ग्रुप समुहाने जाऊन सिनेमा बघण्याचा आनंद लूटत असताना दिसून येत आहेत. सिनेमा रिलीज झाल्यानंतर देखील अनेक कलाकारांची सिनेमा सोबतची नाळ जोडली गेली आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

सिनेमागृहामध्ये जाऊन चाहत्यांना भेटणं, त्यांचे अनुभव ऐकणं आणि वेगवेगळ्या मुलाखती देणं, चाहत्यांसोबत सिनेमातील गाण्यांवर डान्स करणं अशा अनेक गोष्टी या सिनेमातील अभिनेत्री करत असल्याचे दिसून येत आहेत. हा सिनेमा बघायला जात असताना काही महिला गॉगल लावून, नऊवारी साडी नेसून जात आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube