इंडिया के टॉप 1% चा नवा बिहाइंड-द-सीन्स व्हिडीओ समोर; सेटवर अनिल कपूरची जबरदस्त ऊर्जा पाहून चाहते उत्साहित
प्रत्येक भाग अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनवण्यासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या अथक परिश्रमांचीही झलक पाहायला मिळते.
Behind-the-scenes video released : स्टार प्लसच्या आगामी रिअॅलिटी क्विझ शो ‘इंडिया के टॉप 1%’ बद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्सुकतेला आणखी उधाण आणत वाहिनीने नुकताच शोचा एक खास बिहाइंड-द-सीन्स (बीटीएस) व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओमधून शोच्या भव्यतेची, निर्मितीमागील मेहनतीची आणि सेटवरील उत्साही वातावरणाची रोमांचक झलक पाहायला मिळत आहे.
कॅमेरे सुरू होताच संपूर्ण सेट ऊर्जा, उत्साह आणि सांघिक भावनेने भरून जातो. या खास बीटीएस व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना केवळ शोच्या भव्य निर्मितीचीच नव्हे, तर प्रत्येक भाग अधिक प्रभावी आणि मनोरंजक बनवण्यासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या अथक परिश्रमांचीही झलक पाहायला मिळते. प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी कलाकार आणि तांत्रिक चमू किती मेहनत घेतात, हे या व्हिडीओमधून स्पष्टपणे जाणवते.
सैराट’ फेम अरबाज शेखच्या एका व्हिडिओनंतर खळबळ; एफडीएची नोबल हॉस्पिटलवर तातडीची कारवाई
या संपूर्ण वातावरणात आणखी रंग भरतात शोचे सूत्रसंचालक अनिल कपूर. आपल्या उत्साहपूर्ण व्यक्तिमत्त्वाने आणि करिष्माई उपस्थितीने ते संपूर्ण सेटवर सकारात्मक ऊर्जा निर्माण करताना दिसतात. मग ते तांत्रिक टीमसोबत संवाद साधत असोत किंवा पुढील दृश्यासाठी तयारी करत असोत, त्यांच्या प्रत्येक हालचालीत कामाबद्दलचे समर्पण आणि आवड स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे पडद्यामागील हे क्षणही शोइतकेच मनोरंजक आणि आकर्षक वाटतात.
या नव्या बीटीएस व्हिडीओमुळे ‘इंडिया के टॉप 1%’ हा केवळ एक क्विझ शो नसून बुद्धिमत्ता, रणनीती, रोमांच आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रत्येक भागात प्रेक्षकांना विचार करायला लावणारे प्रश्न, थरारक क्षण आणि अनपेक्षित वळणे अनुभवायला मिळणार आहेत. आपल्या बुद्धिमत्तेची खरी कसोटी पाहण्यास सज्ज व्हा. लवकरच ‘इंडिया के टॉप 1%’ हा बहुप्रतीक्षित शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो फक्त स्टार प्लस आणि जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे.