‘भूत बंगला’ : सुरस…चमत्कारिक पण अतर्क्य
Bhoot Bangla Movie Review-Bhoot Bangla Movie Review-प्रियदर्शन आणि अक्षयकुमार (AkshayKumar) हे समीकरण कायम भन्नाट आहे. भूत बंगला निमित्ताने ही जोडी एकत्र आली आहे, त्यांनी एक वेगळी मजा आणलेली आहे.
Bhoot Bangla Movie Review: प्रियदर्शन आणि अक्षयकुमार (AkshayKumar) हे समीकरण कायम भन्नाट आहे. भूत बंगला निमित्ताने ही जोडी एकत्र आली आहे, त्यांनी एक वेगळी मजा आणलेली आहे. भूत बंगलामध्येही (Bhoot Bangla) हे मॅजिक वेगळ्या अर्थाने वर्क होताना दिसतंय. अभिनयाची जुगलबंदी पळापळ धावपळ, भीती, गूढ, रहस्य असा मनोरंजनाचा पॉवरपॅक्ड फॉर्म्युला इथे प्रियदर्शन यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्विस्ट अँड टन आणि एकापेक्षा एक धक्के देण्याच्या कथानकाच्या अनेक वळणांच्या टप्प्यावरून पुढे सरकताना सिनेमा मात्र चांगलाच लांबला आहे उत्कंठा वर्धक करण्याच्या प्रक्रियेत शेवटच्या टप्प्यात सिनेमा अधिक ताणलेला वाटतो… पण भुताटकी काळी जादू रहस्य या रोलर कोस्टर राईडमध्ये काही ठिकाणी आपला अंदाज खरा ठरतो तर काही ठिकाणी आपल्याला चकवा देण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी ठरतात… हॉरर कॉमेडीमधला आत्ताचा मनोरंजनाचा डोकं बाजूला ठेवून बघावा असा हा डोस आहे. बॉक्स ऑफिसच्यादृष्टीने बघायचं झालं तर, सोलो रिलीज आणि कमी स्पर्धेमुळे चित्रपटाला चांगली कमाई करण्याची संधी आहे…पण ते प्रेक्षकांच्या प्रतिसादावर हे सर्वस्वी अवलंबून राहील.
कथा: भुताटकी, गूढ आणि लग्नाचा गोंधळ
‘भूत बंगला’हा चित्रपट एका भुताटकी वाड्याभोवती फिरणाऱ्या वेड्या आणि विनोदी घटनांची कथा सांगतो. अर्जुन आचार्य (अक्षय कुमार) लंडनमध्ये आपल्या बहिणी मीरा (मिथिला पालकर) आणि वडील डॉ. वासुदेव आचार्य (जिष्णू सेनगुप्ता) यांच्यासोबत राहत असतो. मीराचे लग्न राहुलशी (पेरिन मालदे) ठरलेले असते आणि कुटुंब भारतात लग्नासाठी योग्य ठिकाण शोधत असते. अचानक त्यांना कळते की त्यांचे आजोबा दुष्यंत आचार्य (राजेश शर्मा) यांचे मंगलपूर गावात निधन झाले आहे आणि ते इतकी वर्षे जिवंत होते, याची कल्पनाही त्यांना नव्हती. या वाड्याचे वारसदार अर्जुन आणि मीरा ठरतात.
अर्जुन लगेच मंगलपूरला पोहोचतो आणि जीर्ण झालेला वाडा लग्नासाठी सजवण्याचा निर्णय घेतो. व्यवस्थापक शांताराम (असरानी) त्याला ‘वधूसुर’ नावाच्या राक्षसी भुताची गोष्ट सांगतो…जो नववधूंना पळवून नेतो. त्यामुळे गावात वर्षानुवर्षे लग्न झालेले नसते. पण अर्जुन या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. यानंतर एंट्री होते वेडिंग प्लॅनर जगदीश केवलरामानी (परेश रावल) यांची, आणि सुरू होतो लग्नाचा गोंधळ… आणि त्याचबरोबर वाड्यात सुरू होतात विचित्र घटना. पुढे काय घडते, हेच चित्रपटाचा मुख्य थरार आहे.
कथा व दिग्दर्शन: ओल्ड वाइन इन न्यू बॉटल
कथा (आकाश कौशिक) आणि पटकथा (प्रियदर्शन, अभिलाष नायर, रोहन शंकर) यामध्ये मोठी क्षमता आहे. विशेषतः पूर्वार्धात विनोदाची मांडणी जबरदस्त जमली आहे. रोहन शंकर यांचे संवाद हे चित्रपटाचे मोठे बलस्थान…वन-लाइनर्स प्रेक्षकांना खळखळून हसवतात. प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन पुन्हा त्यांच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसते. ‘हेरा फेरी’, ‘हंगामा’, ‘हलचल’ यांची आठवण करून देणारी फिजिकल कॉमेडी, गैरसमज आणि गोंधळ यात ठासून भरलेला आहे. इंटरव्हल ब्लॉक अनपेक्षित आणि प्रभावी आहे. दृश्य पातळीवर चित्रपट भव्य आहे आणि मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखा आहे.
मात्र उत्तरार्धात चित्रपटावरील पकड सैल होते…हॉररचा भाग तितका प्रभावी वाटत नाही. ‘भूल भुलैया’ची आठवण करून देणारी कथा प्रेक्षकांना नाविन्याचा फील देत नाही…क्लायमॅक्स लांबतो अन् सिनेमा ताणला आहे…याची जाणीव होते…
अभिनय: अक्षय कुमारचा वन-मॅन शो
अर्जुनच्या भूमिकेत अक्षय कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये दिसतो. त्याची कॉमिक टाइमिंग आणि गंभीर दृश्यांतील सहजता दोन्ही प्रभावी आहेत.
राजपाल यादव – पूर्वार्धात धमाल, अक्षयसह त्याची ‘तू-तू, मैं-मैं’ खास आकर्षण
परेश रावल – गोंधळातही ठसा उमटवणारा अभिनय
असरानी – विनोदी दृश्यांमध्ये लक्षवेधी… त्या वयातही त्यांनी केलेली फिजिकल कॉमेडी आणि अक्षय कुमार सोबतची त्यांची जुगलबंदी दिलखेच
जिष्णू सेनगुप्ता, मनोज जोशी, झाकीर हुसेन – चांगल्या भूमिका
मिथिला पालकर – लक्षवेधी चेहरा
तब्बू – कमी स्क्रीन टाइम, पण प्रभावी
वामिका गब्बी – ट्रॅक जबरदस्तीचा वाटतो
संगीत व तांत्रिक बाजू
प्रीतमचं संगीत आणि रोमँटिक गाणं हिट नाही या गोष्टीसाठी हा सिनेमा लक्षात राहील… प्रीतमने अगदीच डाव्या हाताने संगीत केले असेच वाटत राहते.
‘राम जी आके भला करेंगे’ लक्षात राहणारे. ‘ओ सुंदरी’, ‘तू ही दिसदा’ ‘ओ रे ओ सावरिया’ visualsमुळे उठून दिसते
पार्श्वसंगीत: रॉनी राफेल – हे गाण्याच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे
तांत्रिक बाजू
सिनेमॅटोग्राफी (दिवाकर मणी) – उत्कृष्ट
प्रॉडक्शन डिझाइन (साबू सिरिल) – भव्य
VFX (WRC Studio LLP) – प्रभावी
ॲक्शन – लक्षवेधी
एडिटिंग – अजून कात्री सहज लागू शकली असती…
का पाहावा?
‘भूत बंगला’ हा प्रामुख्याने एक एंटरटेनिंग कॉमेडी राईड आहे.
पूर्वार्ध – जबरदस्त, हास्याचा डोस
अभिनय – विशेषतः अक्षय कुमार
प्रियदर्शन स्टाईल गोंधळ
का टाळावा ?
उत्तरार्ध – कमकुवत
क्लायमॅक्स – लांबलेला
हॉरर – अपेक्षेपेक्षा कमी प्रभावी
थोडक्यात काय – हॉरर कॉमेडी जॉनरचा मनोरंजनाचा डोकं बाजूला ठेवून बघावा असा हा प्रियदर्शन टच डोस आहे.
या सिनेमाला मी देतोय साडेतीन स्टार्स
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक