Big Boss मध्ये दिसणार ‘हे’ रिअल लाईफ पॉवर कपल

Big Boss मध्ये दिसणार ‘हे’ रिअल लाईफ पॉवर कपल

Big Boss : बिग बॉस (Big Boss ) हा रिअ‍ॅलिटी शो नेहमीच चर्चेचा ठरत असतो. यामध्ये असणारे सर्वच स्पर्धकांची काहीना काही खासियत असते. तसेच अनेक चर्चित चेहरे यामध्ये घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच हा शो चर्चेत आणि वादात देखील सापडतो. त्यात आता बॉलिवूडचं आणखी एक रिअल लाईफ पॉवर कपल बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

Assembly Elections : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले;

बिग बॉसमध्ये दिसणार पॉवर कपल…

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरांत पोहचलेली आणि सुशांत सिंग रजपूतसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे मराठमोळी अंकीता लोखंडे (Ankita Lokhande). तर नेहमीच आपल्या कपलच्या पोस्टमुळे चाहत्यांना भूरळ घालतात ती अंकीता आणि तिचा पती विकी जैन (Vickey Jain) त्यांच्या लग्नच्या, प्रेग्नंसीच्या चर्चानंतर आता हे रिअल लाईफ पॉवर कपल बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

Raj Thackeray : ..तर आम्ही टोलनाकेच जाळून टाकू! राज ठाकरेंचा सरकारला रोखठोक इशारा

बिग बॉसचा 17 वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये अंकीता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे रिअल लाईफ पॉवर कपल बिग बॉसमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता हे दोघे खरचं बिग बॉसमध्ये दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यामध्ये गेल्यावर हे कपल काय धुमाकुळ घालणार हे पाहणं ही रंजक ठरणार एवढ नक्की.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच अंकीताच्या वडिलांचं निधन झालं आहे. तिचे वडील श्रीकांत लोखंडे निधन झालं. अंकीताचं तिच्या वडीलांशी अत्यंत घनिष्ठ नातं होतं. ती नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त करत होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना आरोग्याच्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा अंकिताने त्यांचे हॉस्पिटलमध्ये असतानाचे आणि डिस्चार्ज झाल्याचे फोटो पोस्ट केले होते. वडिलांच्या निधनाने अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube