बॉलीवूडवर शोककळा! दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Bharat Kapoor passes away हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक मोठा काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं आहे.
Bollywood mourns! Veteran actor Bharat Kapoor passes away, breathes his last at the age of 80 :
हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक मोठा काळ गाजवणारे दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन झालं आहे. त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात सोमवारी 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर लगेचच संध्याकाळी साडेसहा वाजता कुटुंबीय आणि जवळच्या मित्र मंडळींच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.
वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशींसाठी मालव्य योग; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
भरत कपूर यांचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यानंतर अखेर त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या निधनाची माहिती अभिनेते अवतार गिल यांनी माध्यमांना दिली.
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
भरत कपूर यांच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर 1970 ते 90 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक संस्मरणीय अशा भूमिका साकारल्या, सहाय्यक अभिनेते असो किंवा खलनायक त्यांच्या भूमिका कायम लक्षात राहतील अशाच होत्या. मात्र 2011 नंतर ते अभिनय करताना दिसले नाहीत. त्यांचे चित्रपटांमध्ये नुरी, राम बलराम, लव्ह स्टोरी, बाजार, गुलामी, आखरी रास्ता, सत्यमेव जयते, स्वर्ग, खुदागवा, बरसात, साजन चले ससुराल यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे.