अन्यायावर विजयाची गर्जना… ‘दशमी’! विजय, शक्ती आणि परिवर्तनाला समर्पित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Dashmi हा मराठी चित्रपट ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

Dashmi

‘Dashmi’ film dedicated to victory, strength, and transformation is set to reach audiences : भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्माव’र धर्माचा आणि दुष्ट शक्तींवर स्त्रीशक्तीच्या विजयाचा शाश्वत संदेश देणारा दिवस आहे. भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली, तर आदिशक्ती देवी दुर्गेने महिषासुराचा संहार करून संपूर्ण सृष्टीला शक्ती, धैर्य आणि विजयाचा नवा अर्थ दिला. याच विजयाच्या, शक्तीच्या आणि परिवर्तनाच्या विचारांना समर्पित केएनके बॉक्स प्रस्तुत ‘दशमी’ हा मराठी चित्रपट ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांचे आहे.

जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेत रणकंदन; अमित शाह संसदेत स्पष्टीकरण देणार?

विजय, शक्ती आणि संघर्षाची झलक दाखवणाऱ्या ‘दशमी’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले. प्रत्येक संघर्षातून उभा राहणारा विजय म्हणजेच खरी ‘दशमी’ हा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम,अभिनेत्री गौरी इंगवले, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकवाड, शाम माशाळकर, राज कुंदन आणि ‘दाक्षिणात्य स्टार’ रवि प्रकाश असे नामवंत कलाकार दिसणार आहेत.

शिर्डी मतदारसंघ खुला होणार; अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होणार; रामदास आठवलेंचा वेगळाच तर्क

यावेळी बोलताना दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले म्हणाले, ‘दशमी’ हा विचार आहे, जो प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कुटुंबाला आत्मविश्वास आणि बळ देतो. ‘दशमी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या धैर्याचा आणि सत्याच्या विजयाचा प्रवास आहे. भारतीय संस्कृतीत विजयादशमी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. त्याच विचाराला आजच्या काळातील सामाजिक वास्तवाशी जोडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर विचार करायला लावणारा आणि मनात दीर्घकाळ घर करणारा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ऑक्टोबरला ‘दशमी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, याचा आम्हा संपूर्ण टीमला विशेष आनंद आहे.

ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना मोठा दिलासा! लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे भव्य दृश्यरचना आणि उच्च दर्जाचे तांत्रिक सादरीकरण हे ‘दशमी’चे खास वैशिष्ट्य आहे. प्रत्येक फ्रेम बारकाईने साकारण्यात आली असून ‘दशमी’ची कथा रहस्याच्या अनेक स्तरांनी विणलेली आहे. कथानकातील धागेदोरे सहज उलगडत नाहीत. प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न, अनपेक्षित वळणे आणि धक्कादायक खुलासे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. लेखन आणि संगीत याची जबाबदारी सुरेश पंडित यांनी सांभाळली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स-क्राईम थ्रिलरचा नवा मापदंड निर्माण करण्याची क्षमता असलेला ‘दशमी’ प्रत्येक चित्रपटप्रेमीने मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव असणार आहे.

follow us