‘दृश्यम 2’ ठरला या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘दृश्यम 2’ ठरला या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

मुंबई : अभिषेक पाठक दिग्दर्शित अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू स्टारर ‘दृश्यम 2’ ने जगभरात 300 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. त्यामुळे ‘दृश्यम 2’ हा या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक करणारा चित्रपट ठरला आहे. तान्हाजी आणि गोलमाल अगेननंतर अजय देवगणचे हे तिसरे द्विशतक आहे.

केजीएफ 2 नंतर दृष्यम 2 हा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक 4थ्या वीकेंडची कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे. चित्रपट चौथ्या बुधवारीही स्थिर आहे आणि 27 व्या दिवशी 1.43 कोटी रुपये कमावले आणि चौथ्या आठवड्यात 18.06 कोटी रुपये कमावले! 27 दिवसांचे पॅन इंडिया बॉक्स ऑफिस कलेक्शन रुपये 214.35 कोटी आहे.

हा चित्रपट दिग्दर्शक अभिषेक पाठकचे त्याच्या दुसऱ्या दिग्दर्शनातील पहिले द्विशतक आणि निर्माता म्हणून कुमार मंगत पाठकचे पहिले द्विशतक बनले आहे. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजत कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट अजय देवगणचा गोलमाल अगेन नंतर परदेशात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. दृश्यम 2 हा पहिल्या भागाच्या तिप्पट व्यवसाय करणारा दुर्मिळ सिक्वेल आहे!

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube