अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयावर ईडीची कारवाई! नेमकं प्रकरण काय?
ED Action on Actor Shekhar Sumans Close अभिनेता शेखर सुमन यांचे जवळचे मित्र व सहकारी धर्मेश संगानी यांच्या कंपनीवर ईडीने कारवाई केली आहे.
ED Action on Actor Shekhar Sumans Close associate Dharmesh Sangani : हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता शेखर सुमन यांचे जवळचे मित्र व सहकारी धर्मेश संगानी यांच्या कंपनीवर ईडीने (प्रवर्तन निदेशालय) कारवाई केली आहे. धर्मेश संगानी हे एक फिल्म निर्माते असून त्यांनी शेखर सुमन यांच्यासोबत मिळून ‘शेखर सुमन फिल्म अकॅडमीची’ स्थापना केली होती.
पार्थ पवार आणि कायनात धर यांचा 29 जुलैला साखरपुडा, जाणून घ्या पवार कुटुंबियांची होणारी सून कोण?
धर्मेश यांनी विदेशामध्ये अघोषित संपत्ती ठेवल्याच्या आरोपाअंर्तगत ईडीने त्यांच्या ‘कलानी इम्पेक्स लिमिटेड’ या कंपनी विरोधात “फेमा” च्या (विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियम) अंतर्गत 10 जुलैला मुंबई येथे कारवाई केली होती. ईडीच्या तपासणी दरम्यान धर्मेश यांनी त्यांचा मोबाईल इमारतीच्या 13 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही ईडीच्या अधिकाऱ्यांनी धर्मेश यांच्यावर लावला आहे.
धर्मेश यांच्या विदेशातील बँक खात्याची आणि अघोषित संपत्तीची कागदपत्रेही मिळाली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच कॅनडाच्या एका कंपनीत धर्मेश यांची अघोषित भागेदारी असल्याचेही ईडीने सांगितले. अमेरिकेच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटेनच्या अधिकाऱ्यांना धर्मेश यांच्याजवळ 7.4 किलोग्रॅम सोने मिळाले व ते त्यांनी जप्त केले होते, असा दावाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणाची ईडी सखोल तपासणी करत आहे.
दरम्यान अभिनेता शेखर सुमन सध्या त्यांच्या ‘शेखर टूनाईट’ या शोमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या शोमध्ये ते केंद्र व राज्य सरकारला नेहमी टोमणे मारताना दिसतात. धर्मेश हे शेखर सुमन यांचे को फाउंडर असल्यामुळे आणि शेखर सुमन यांनी शोमधून सरकारवर केलेल्या टीकांमुळे ही कारवाई होत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तसेच ही कारवाई म्हणजे सरकारविरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशा देखील चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.