भव्य हनुमंताच्या रूपाने वाढवली उत्सुकता! ‘बजरंगी’ चित्रपटाचे दमदार पोस्टर प्रदर्शित कोण साकारणार भूमिका?
Bajrangi ’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Excitement builds with magnificent avatar of Hanuman Powerful poster of movie Bajrangi unveiled : आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर उभा असलेला एक तरुण, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि किल्ल्याची पार्श्वभूमी अशी लक्षवेधी दृश्यरचना पोस्टरमध्ये पाहायला मिळते. या भव्य मांडणीतून चित्रपटाच्या कथेला गूढ पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात.
मराठवाडा पदवीधर निवडणूक; तीन टर्म आमदार सतीश चव्हाणांची वाट भाजप अडविणार ?
पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती लक्ष वेधून घेते. तिच्यासमोर पाठ करून उभा असलेला तरुण हातात भगवा कपडा घेऊन उभा आहे. एका बाजूला भव्य हनुमंताचं रूप तर दुसरीकडे किल्ला, भगवे ध्वज आणि आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश, यामुळे पोस्टरला प्रभावी आणि सिनेमॅटिक रूप मिळाले आहे. या दृश्यातून या तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेची झलक मिळते.
‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं, यंदाच्या दिवाळीत रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
पोस्टरमधील या तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे, त्याच्या आयुष्यात कोणता प्रसंग घडतो आणि या भव्य पार्श्वभूमीमागची कथा काय आहे, असे अनेक प्रश्न पोस्टर पाहिल्यानंतर निर्माण होतात. मात्र चित्रपटाच्या कथेचा फारसा उलगडा न करता निर्मात्यांनी ही उत्सुकता कायम ठेवली आहे.‘बजरंगी’च्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार असून त्याची ही भूमिका चित्रपटाच्या कथेत नेमकं काय वळण आणणार याची उत्सुकता आहे. सिद्धार्थ जाधव या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अंदाजात येणार आहे.
‘खाकी’पासून ‘दृश्यम द कन्क्लूजन’पर्यंत; कमलेश सावंतांनी शेअर केले अजय देवगणसोबतचे खास अनुभव
‘बजरंगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केलं असून, लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी काही महत्त्वाचे संकेत मिळत असले तरी त्यामागची संपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखांचा प्रवास चित्रपटातूनच उलगडणार आहे.
‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी योगेश देशपांडेंना सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाले, “‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास आहे. या प्रवासातून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. पोस्टरमधून आम्ही कथेचा फारसा उलगडा न करता उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातून ही कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.”