ब्रिटिश सत्तेला हादरावणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचा धगधगता इतिहास; ‘पत्री सरकार 1942’ चे दमदार पोस्टर प्रदर्शित!

Patri Sarkar 1942 क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित ‘पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पोस्टर दिमाखात प्रदर्शित

Patri Sarkar 1942

Fiery saga of Krantisinh Nana Patil who shook foundations of British rule striking poster of ‘Patri Sarkar 1942’ has been unveiled : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सातारा भूमीत ब्रिटिश सत्तेला सळो की पळो करून सोडणाऱ्या प्रतिसरकारचा जाज्वल्य आणि धगधगता इतिहास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ या आगामी मराठी चित्रपटाचे अधिकृत पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘भागीरथी मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत हा भव्य ऐतिहासिक चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम द कन्क्लूजन’वर मोहनलाल फिदा; संपूर्ण टीमसाठी दिला खास संदेश!

स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिसरकारची चळवळ, भूमिगत राहून ब्रिटिशांना दिलेला लढा आणि क्रांतीकारकांचे अतुलनीय शौर्य याचे प्रत्यंतर या पोस्टरमधून येते. पोस्टरवरील कलाकारांचा करारी बाणा आणि स्वातंत्र्यलढ्याचे वातावरण प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.

दमदार कलाकारांची फौज उलगडवणार रहस्याच्या सावलीत ‘खग्रास’ची गोष्ट! चित्रपटाचे टायटल पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली असून, लेखन, गीत, संगीत आणि दिग्दर्शन अशा विविध जबाबदाऱ्या मनीष अनसुरकर यांनी सांभाळल्या आहेत. चित्रपटात अनिल राबाडे, अनुराधा धामणे, सिद्धार्थ बदी, शुभम गवई, रश्मी साळवी आणि तृप्ती शेडगे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय, लोकप्रिय अभिनेते अंकित मोहन चित्रपटात अतिथी भूमिकेत दिसणार असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या दमदार आवाजात या चित्रपटाचे निवेदन असणार आहे, ही या चित्रपटाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

राज्य सरकारला MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही मग चौकशी कशी? विजय कुंभारांनी सांगितला कायदेशीर पेच

चित्रपटाचे छायांकन संदीप वाटवे, परमहंस पाठक, सुमेध मराठे यांनी केले असून संकलन कर्तव्य अनिल मोकल यांचे आहे. पार्श्वसंगीत सौरभ लता शिवकुमार यांनी दिले आहे. स्वातंत्र्यलढ्याचा हा सुवर्ण अध्याय मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असून २० नोव्हेंबरपासून ‘पत्री सरकार १९४२’ संपूर्ण महाराष्ट्रात गर्जना करण्यासाठी सज्ज झाला आहे.

follow us