‘Narnia: The Magician’s Nephew’ची पहिली झलक समोर; ग्रेटा गर्विग यांच्या भव्य कल्पनाविश्वाची मिळाली झलक

Narnia The Magician’s Nephew हा चित्रपट सी. एस. लुईस यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे.

Narnia The Magician Nephew

First look at Narnia The Magician’s Nephew revealed glimpse into Greta Gerwig’s grand imaginative world : फेब्रुवारी 2027 मध्ये पुन्हा एकदा जादू मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका ग्रेटा गर्विग सी. एस. लुईस यांच्या लोकप्रिय ‘नार्निया’ विश्वाला नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. ‘बार्बी’च्या जगभरातील यशानंतर गर्विग आता बहुप्रतिक्षित फँटसी अॅडॅप्टेशन ‘Narnia: The Magician’s Nephew’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. हा चित्रपट सी. एस. लुईस यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे.

SS Retailच्या शेअर्सचा धमाका; दोन दिवसांत पैसे दुप्पट !

गेल्या आठवड्यात निर्मात्यांनी चित्रपटाचा मोशन लोगो प्रदर्शित केला होता. त्यानंतर आता चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवणाऱ्या काही खास छायाचित्रांचा संच समोर आला आहे. ‘Narnia: The Magician’s Nephew’च्या निर्मितीदरम्यानची ही छायाचित्रे असून, त्यातून ग्रेटा गर्विग कोणत्या पद्धतीने नार्नियाचं जग उभं करत आहेत, याची पहिली झलक पाहायला मिळत आहे.

‘साऊथ ते मराठी’ रवी प्रकाश यांची खाकी वर्दीत दमदार एन्ट्री!

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या फोटोंमधून चित्रपटाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि त्यातील दृश्यविश्वाची झलक मिळते. प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि जादुई विश्वात घेऊन जाणाऱ्या या चित्रपटाच्या व्हिज्युअल्सची प्राथमिक झलक या छायाचित्रांमधून समोर आली आहे. प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना ‘Narnia: The Magician’s Nephew’ हा मोठ्या पडद्यावरील महत्त्वाचा फँटसी चित्रपट ठरण्याची शक्यता आहे. साहित्यविश्वातील सर्वाधिक लोकप्रिय फँटसी जगांपैकी एक असलेल्या नार्नियाची ओळख नव्या पिढीतील प्रेक्षकांना करून देण्याची तयारी या चित्रपटातून होत आहे.

नव्या कलाकारांसोबत दिग्गज कलाकारांची साथ

‘Narnia: The Magician’s Nephew’मध्ये डेव्हिड मॅकेना आणि बीट्रिस कॅम्पबेल हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत एमा मॅकी, केरी मुलिगन, कोब्ना होल्डब्रुक-स्मिथ, डॅनियल क्रेग आणि मेरिल स्ट्रीप यांच्यासह अनेक अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘Narnia: The Magician’s Nephew’ हा चित्रपट 12 फेब्रुवारी 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 2 एप्रिल 2027 पासून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे. चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय वितरण सोनी पिक्चर्स रिलीजिंग इंटरनॅशनल करत आहे.

follow us