‘Heart of the Beast’चा International Dog Day स्पेशल; ब्रॅड पिटचा कुत्र्यासोबतचा अंदाज चाहत्यांना करेल खुश

Brad Pitt: ब्रॅड पिटचे कुत्र्यांवरील प्रेम केवळ चित्रपटापुरते मर्यादित नाही. तो स्वतःच्या Sundae आणि Vandy या कुत्र्यांचा प्रेमळ ‘डॉग पॅरेंट’ आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
International Dog Day

International Dog Day : हॉलिवूडचा ग्लोबल सुपरस्टार ब्रॅड पिट ( Brad Pitt) आगामी ‘Heart of the Beast’ चित्रपटामध्ये एका श्वानासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. International Dog Day निमित्त Paramount Picturesने ‘Heart of the Beast’च्या सेटवरील एक खास बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्रॅड पिट चित्रपटात दिसणाऱ्या कुत्र्यासोबत खेळकर अंदाजात वेळ घालवताना दिसत आहे. या झलकमधून अभिनेत्याची कुत्र्यांबद्दलची आपुलकी आणि त्याचा हलकाफुलका अंदाज पाहायला मिळतो.

ब्रॅड पिटचे कुत्र्यांवरील प्रेम केवळ चित्रपटापुरते मर्यादित नाही. तो स्वतःच्या Sundae आणि Vandy या कुत्र्यांचा प्रेमळ ‘डॉग पॅरेंट’ आहे. नुकत्याच दिलेल्या Esquire Indiaच्या मुलाखतीत त्याने आपल्या कुत्र्यांसोबतच्या आयुष्याबद्दलही सांगितले होते. ‘Heart of the Beast’मध्ये Odinची भूमिका साकारणाऱ्या Uber या German Shepherd कुत्र्याबद्दलही पिटने कौतुकाने भाष्य केले आहे. त्याने आपल्या या चार पायांच्या सहकलाकाराला “चित्रपटाचा स्टार” असे म्हटले आहे.


काय आहे ‘Heart of the Beast’ची कथा?

‘Heart of the Beast’ हा एक थरारक सर्व्हायव्हल थ्रिलर आहे. यात Special Forces अधिकारी James Belmont (ब्रॅड पिट) आणि त्याचा combat dog Odin यांच्यातील अतूट नाते दाखवण्यात आले आहे. अलास्काच्या कठोर आणि प्रतिकूल जंगलात दोघांसमोर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान उभे ठाकते—जिवंत राहण्याचे! या चित्रपटात ब्रॅड पिट पुन्हा एकदा एका कुत्र्याच्या साथीदारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मात्र यावेळी त्यांच्यातील नाते केवळ भावनिक नसून, त्यांच्या जगण्याचा आणि मृत्यूचा फरक ठरवणारे असेल. चित्रपटात J.K. Simmons आणि Anna Lambe यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन Cameron Alexander यांनी केले आहे. Olivia Hamilton, Marty Bowen, David Ayer आणि Brad Pitt हे चित्रपटाचे निर्माते आहेत. Damien Chazelle, Scott Lumpkin, Cameron Alexander, Chris Long, Pete Chiappetta, Anthony Tittanegro, Andrew Lary, Sophie Cassidy आणि Zack Conroy हे कार्यकारी निर्माते आहेत. Paramount Picturesने Domain Entertainment आणि Gulfstream Pictures यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘Heart of the Beast’ 25 सप्टेंबर 2026 रोजी भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us